इनाम-धामणी: विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचा ठराव करणारं ‘हे’ आहे महाराष्ट्रातील पहिलं गाव

मुंबई तक

• 10:55 AM • 25 May 2022

स्वाती चिखलीकर, मिरज: विधवा आणि परित्यक्ता महिलांचा पुनर्विवाह करून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मिरज तालुक्यातील इनाम धामणी या गावामध्ये संमत करण्यात आला आहे. अशा प्रकारचा ठराव करणारे इनाम धामणी हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. सरपंच अश्विनी कोळी, उपसरपंच अनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे, सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी यांच्यासह बैठकीला […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, मिरज: विधवा आणि परित्यक्ता महिलांचा पुनर्विवाह करून त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्याचा ऐतिहासिक ठराव मिरज तालुक्यातील इनाम धामणी या गावामध्ये संमत करण्यात आला आहे. अशा प्रकारचा ठराव करणारे इनाम धामणी हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे.

हे वाचलं का?

सरपंच अश्विनी कोळी, उपसरपंच अनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी रविंद्र शिंदे, सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी यांच्यासह बैठकीला महिला ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

उपसरपंच अनिता पाटील यांनी मांडलेल्या ऐतिहासिक ठरावाला राजमती प्रकाश मगदूम यांनी अनुमोदन दिले. यावेळी महिला सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात ठरावाला सर्वानुमते मंजुरी दिली. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व शासनाच्या निधीतून विधवा व परित्यक्ता महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.

या निर्णयाचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. शासनाच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विधवा परित्यक्ता व विधवांच्या व्यथा ग्रामपंचायतींच्या सदस्यांना जाणून घेता आल्या. यावेळी इनाम धामणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या घटकांसाठी काही करता येईल का याकडेही लक्ष दिले.

ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्याने या ठरावाचे सर्वांनी समर्थन केले अशी माहिती सरपंच अश्विनी कोळी व उपसरपंच अनिता पाटील यांनी दिली. विधवा व परित्यक्ता महिलांच्या पुनर्विवाहाचा ठराव संमत करणारे सांगली जिल्ह्यातील इनाम धामणी हे एकमेव गाव आहे.

ग्रामपंचायत जिल्हा परिषद व महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून यासाठी काही निधीची तरतूद केली आहे. ती सार्थकी लावण्यासाठी समाजाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे ठरणार आहे.

बुलडाणा: विधवा वहिनीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ, सर्व स्तरातून तरुणाचं कौतुक!

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय, महाराष्ट्र सरकारचं पुरोगामी पाऊल

महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे शासन परिपत्रक काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आले आहे.

आज भारत देश विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे.

या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसार माध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायती काम करावे, असे आवाहन करत १७ मे २०२२ रोजी शासन परिपत्रक जारी केले.

या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्राम पंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी श्रीमती कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे मरण पावली.

कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. कोल्हापूर जिल्हा हा राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांचा जिल्हा आहे. या याच कालावधीत राजश्री छत्रपती शाहू स्मृती शताब्दी साजरा करण्यात येत होता. त्यामुळे राजश्री शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच श्री.पाटील यांनी सांगितले.

या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्राम पंचायत पॅटर्न सर्व राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.

    follow whatsapp