नाशिक : कांदे व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड, आयकर विभागाने जप्त केले २५ कोटी

मुंबई तक

• 11:00 AM • 24 Oct 2021

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून आयकर विभागाने कांदे व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडसत्रात एका व्यापाऱ्याकडे आयकर विभागाला २५ कोटी रोख रक्कम सापडली आहे. आयकर विभागाने ही रक्कम हस्तगत केली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईत आयकर विभागाच्या हातात १२५ कोटींची अघोषित मालमत्ता हाती आल्याचं बोललं जातंय. पिंपळगाव बसवंत येथील काही कांदा व्यापाऱ्यांसह बारा […]

Mumbaitak
follow google news

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून आयकर विभागाने कांदे व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या आहेत. या धाडसत्रात एका व्यापाऱ्याकडे आयकर विभागाला २५ कोटी रोख रक्कम सापडली आहे. आयकर विभागाने ही रक्कम हस्तगत केली आहे.

हे वाचलं का?

गेल्या २-३ दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईत आयकर विभागाच्या हातात १२५ कोटींची अघोषित मालमत्ता हाती आल्याचं बोललं जातंय. पिंपळगाव बसवंत येथील काही कांदा व्यापाऱ्यांसह बारा ते १५ जणांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. हस्तगत केलेल्या नोटांची मोजणी ही स्टेट बँकेत चालली होती.

बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत येथील असून, दोन व्यापारी नाशिक मधील आहेत. सदर व्यापाऱ्यांनी एकूण शंभर कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याचा आयकर विभागाचा अंदाज आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या करवाईकडे लागले आहे. देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते.

यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

    follow whatsapp