याला म्हणतात ‘खरा मित्र’, भारताच्या कठीण काळात भरघोस मदत

मुंबई तक

• 04:39 AM • 08 May 2021

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ही भारतात अत्यंत भयंकर असल्याचं दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळेच आरोग्य व्यवस्थेवरील ताण देखील वाढू लागलेला आहे. यामुळे अनेक गोष्टींची कमतरता भासू लागली आहे. अशावेळी विविध देश भारताच्या (India) मदतीसाठी धावून येत आहेत. असाच एक भारताचा आणखी एक […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ही भारतात अत्यंत भयंकर असल्याचं दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत आणि त्यामुळेच आरोग्य व्यवस्थेवरील ताण देखील वाढू लागलेला आहे. यामुळे अनेक गोष्टींची कमतरता भासू लागली आहे. अशावेळी विविध देश भारताच्या (India) मदतीसाठी धावून येत आहेत. असाच एक भारताचा आणखी एक मित्र आता मदतीला पुढे सरसावला आहे. तो देश म्हणजे इस्रायल.

हे वाचलं का?

इस्रायलाच्या (Israel) परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताला कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी विविध प्रकारची मदत पाठवायला सुरुवात झाली आहे. या आठवडाभरात विविध विमानांच्या सहाय्याने ही मदत भारतात येत असून त्यासाठी इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद, आरोग्य मंत्रालय, आर्थिक मंत्रालय यांच्यासोबत तेल-अवीवमधील भारतीय दूतावास आणि नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाचे सहकार्य मिळत आहे.

इस्रायल पाठवत असलेल्या साहित्यात हजारो वैयक्तिक किंवा सामूहिक वापरासाठी असलेले ऑक्सिजन जनरेटर, श्वसनाला मदत करणारे रेस्पिरेटर, औषधं आणि वैद्यकीय सामुग्री आहे. या प्रसंगी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्कनाझी यांनी म्हटले, ‘भारत हा आमच्या सगळ्यात जवळच्या आणि महत्त्वाच्या मित्र देशांपैकी एक आहे. भारतातील संकटाच्या या प्रसंगी इस्रायल भारतासोबत असून आमच्या भारतीय बंधू आणि भगिनींसाठी आयुष्य वाचवणारी वैद्यकीय उपकरणे आणि अन्य प्रकारची मदत पाठवत आहे. भारत आणि इस्रायलमधील संबंध सामरिक भागीदारीच्या स्वरुपाचे असून त्यात राजकीय, सुरक्षा आणि आर्थिक विषयांचा समावेश आहे.’

‘या’ देशाचे आभार मानावे तेवढे थोडेच, भारताच्या कठीण काळात अत्यंत मोलाची मदत

या संयुक्त मदत कार्यात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाची आर्थिक संबंध शाखा, इस्रायल-भारत चेंबर ऑफ कॉमर्स, द इस्रायल-एशिया चेंबर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसेशियन ऑफ इस्रायल, द फेडरेशन ऑफ इंडो-इस्रायली चेंबर्स ऑफ कॉमर्स, द इस्रायल एक्सपोर्ट इन्स्टिट्यूट, द स्टार्ट अप नेशन सेंट्रल यांच्यासह भारतात काम करणाऱ्या कंपन्या सहभागी आहेत.

अमडॉक्स या कंपनीने 150 ऑक्सिजन जनरेटर देण्याचे घोषित केले आहे. ज्युईश जॉइंट डिस्ट्रिब्युशन कमिटी ऑक्सिजन सिलेंडर देणार असून मुंबईचे केईएम हॉस्पिटल, पनवेलचे महात्मा गांधी हॉस्पिटल आणि अहमदाबादच्या सरदार पटेल हॉस्पिटलला वेंटिलेटर पुरवणार आहे.

Sputnik Light : कोरोनाला रोखण्यासाठी नव्या लसीचा एक डोस पुरेसा, कंपनीची घोषणा

कोरोना संकटाच्या सुरुवातीला भारताने इस्रायलला मास्क, पीपीई किट आणि औषधं बनवण्यासाठी कच्चा माल पुरवला होता. तसेच भारतात रहाणाऱ्या इस्रायली नागरिकांना परत पाठवण्यातही मदत केली होती. तर आता भारतासाठी जो कठीण काळ आहे त्यावेळी इस्त्रायल सढळ हस्ते मदत करत आहे. बहुदा यालाच मैत्री असे म्हणतात!

    follow whatsapp