बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं आयुष्य सध्या समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं व्यक्तिगत आयुष्य समोर आलं होतं. त्याची चर्चाही झाली. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिलेल्या भेटवस्तू यांचीही चर्चा झाली. शनिवारी जॅकलीन आणि सुकेश चंद्रशेखर यांचा आणखी एक इंटिमेट फोटो व्हायरल झाला. त्यात तिच्या गळ्यावर लव्ह बाईटही दिसल्याने त्याची प्रचंड चर्चा झाली. आता यावर जॅकलिनने एक ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे जॅकलिनने?
‘या देशाने आणि तेथील जनतेने मला नेहमीच अपार प्रेम आणि आदर दिला आहे. यात माझ्या मीडियातील मित्रांचा समावेश आहे, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकलो आहे. मी सध्या कठीण काळातून जात आहे, पण मला खात्री आहे की माझे मित्र आणि चाहते मला यात साथ देतील,या आत्मविश्वासाने, मी माझ्या मीडिया मित्रांना विनंती करेन की, माझ्या गोपनीयतेवर आणि वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणारे फोटो शेअर करू नका. तुम्ही स्वतःशी, तुमच्या प्रियजनांसोबत हे करणार नाही, मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबतही हे करणार नाही. आशा आहे की न्यायाचा आणि विजय होईल. धन्यवाद.’
शनिवारी जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. फोटोत जॅकलीन आणि सुकेश एकत्र दिसत आहेत आणि सुकेश अभिनेत्रीच्या नाकाचे चुंबन घेत आहे. त्याचवेळी फोटोमध्ये जॅकलीन हसताना दिसत आहे. यासोबतच फोटोमध्ये जॅकलिनच्या मानेवर डार्क रंगाची खूण दिसत आहे, ज्याला सोशल मीडिया यूजर्स लव्ह बाईट म्हणत आहेत.
सुकेश जॅकलिनच्या आयुष्यात कसा आला?
डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनसोबत संपर्क करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र जॅकलीनने त्याला भाव दिला नाही. त्यानंतर सुकेश चंद्रशेखरने डोकं लावलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसमधला नंबर घेऊन त्याने जॅकलिनच्या एका निकटवर्तीयाशी संपर्क साधला. त्या मार्गे त्याने जॅकलिनच्या संपर्कात येण्याचा पर्याय निवडला.
जॅकलिनसचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलला त्याने संपर्क साधला होता. जॅकलिनचं इंस्टाग्राम पेज पाहिलं तर शान आणि तिची चांगली दोस्ती आहे हे लक्षात येतं. शानने एक चांगला मित्र म्हणून जॅकलिनला सांगितलं की त्याला एका व्हिआयपी नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवरून ज्याने फोन केला होता त्या कॉलरला तुझ्याशी बोलायचं आहे.
हा कॉल व्हीआयपी नंबरवरून आला होता. या फोनवरवरून बोलणाऱ्याने त्याचं नाव शेखर रत्न वेला असं सांगितलं होतं आणि सरकारी कार्यालयातून बोलत आहोत असंही सांगितलं होतं. हा शेखर रत्न वेला म्हणजे दुसरा तिसार कुणी नसून सुकेश चंद्रशेखरच होता.
जॅकलिन फर्नांडिसला सुकेश राजकुमारीसारखं वागवत होता
जॅकलिन आणि शेखऱ उर्फ सुकेश चंद्रशेखर जवळ येत गेले तसे तो जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट देऊ लागला. या भेटींची किंमत कोट्यवधी रूपये होते. सुकेशने आत्तापर्यंत जॅकलिनला सात कोटी रूपयांची गिफ्ट दिली आहेत असा अंदाज वर्तवला जातो आहे.
या भेटवस्तूंमध्ये बिर्किन बॅग, Chanel, Gucci, YSL या ब्रांडचे कपडे, हर्मीस ब्रांडच्या बांगड्या, टिफनी ब्रांडचं ब्रेसलेट, अंगठ्या, झुमके यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर रोलेक्स, रोजर डुबईस, फ्रेंक मुलर या ब्रांडची घड्याळं देऊनही जॅकलिनचं मन जिंकण्याचा प्रयत्न सुकेशने केला. फक्त जॅकलिनलाच नाही तर तिच्या कुटुंबीयांनाही गिफ्ट देण्यात आली. तिच्या आईला एक पोर्श आणि मासेराती कार सुकेशने भेट म्ङणून दिली. जॅकलिनने मात्र आपल्या कुटुंबीयांनी गिफ्ट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT