ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसच्याही अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. ईडीकडून जॅकलिनला समन्स बजावलं गेलेलं आलं आहे. त्याचबरोबर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून जॅकलिन आणि चंद्रशेखरमधील व्यवहाराची महत्त्वाची माहिती समोर आली होती. 200 कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनवर महागड्या वस्तू आणि प्राणी भेट दिल्याचं आरोपापत्रात म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
Jacqueline Fernandezs : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची संपत्ती ‘ईडी’ने का केलीये जप्त?
200 कोटी खंडणीच्या प्रकरणात ईडीने मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही यांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नाडिस यांच्यात जानेवारी 2021 पासून बोलणं सुरू झालं होतं.
जॅकलिन फर्नांडीसला ‘ईडी’ने मुंबई विमानतळावरच रोखलं; थोड्या वेळाने दिली जाण्याची परवानगी
अभिनेत्री जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर यांने चार पर्शियन मांजरींसह कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचं ईडीने आरोपपत्रात म्हटलेलं होतं. तुरुंगात असतानाही चंद्रशेखर जॅकलिनसोबत फोनवरून बोलायचा असंही ईडीने म्हटलेलं होतं.
जेव्हा सुकेश चंद्रशेखर तुरुंगातून बाहेर आला. त्यावेळी त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टेड विमानाचं बुकिंग केलं होतं. इतकंच नाही, तर त्याने जॅकलिनसाठीही मुंबई ते दिल्लीसाठी विमान बुक करुन दिलं होतं. त्यानंतर अभिनेत्री जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर एका हॉटेलमध्ये थांबले होते. चंद्रशेखरने जामीनावर सुटल्यानंतर 8 कोटी रुपये विमान प्रवासावर खर्च केले, असंही ईडीने आरोपपत्रात म्हटलेलं होतं.
अशी ठेवते अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस स्वतःला फीट; पहा फोटो!
ईडीने दिली महागड्या भेटवस्तूंची यादी…
चंद्रशेखरने जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू आणि प्राणी भेट म्हणून दिल्याचं ईडीने आरोपपत्रात सांगितलं होतं. ज्वेलरी, हिरेजडीत ज्वेलरीचे सेट, क्रॉकरी, चार पर्शियन जातीच्या मांजरी (एका मांजरीची किंमत जवळपास 9 लाख रुपये आहे.) आणि 52 लाख रुपये किंमतीचा घोड्यासह अनेक महागड्या वस्तू भेट दिल्याचं ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं होतं.
ADVERTISEMENT