उत्तर प्रदेशातल्या सरहाणपूरमध्ये जैश ए मोहम्मद आणि तहरीक ए तालिबानशी जोडलेल्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. एटीएसने ही कारवाई केली आहे. नदीम असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. एटीएसने या दहशतवाद्याची जी चौकशी केली त्यात त्याने हे सांगितलं की नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखला गेला होता. ती जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने त्याला दिली होती.
ADVERTISEMENT
नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं
नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणाला एक महिना उलटून गेला आहे तरीही त्यांच्या जिवावरचं संकट टळलेलं नाही. नदीम नावाच्या दहशतवाद्याला एटीएसने अटक केली त्यावेळी आपल्याला नुपूर शर्मा यांच्या हत्येचा टास्क देण्यात आला होता असं या दहशतवाद्याने सांगितलं आहे. एटीएसकडून नदीम या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे.
काय आहे नुपूर शर्मांचं प्रकरण?
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या एका चर्चात्मक कार्यक्रमात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंभर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. २७ मे रोजी ही घटना घडली होती त्याचे पडसाद देशभरात आणि नंतर आखाती देशांमध्येही उमटले होते. १ जून ला या प्रकरणात महाराष्ट्रात पहिली FIR दाखल झाली. २ जूनला मुंबई, हैदराबाद आणि पुण्यातही FIR दाखल झाली.
भाजप नेत्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून गेल्या. भाजपवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. अनेक आखाती देशांनीही भाजपवर टीका केली.
एटीएसने नेमकं काय म्हटलं आहे? एटीएसने एक प्रेस नोट जारी केली आहे त्यामध्ये हे नमूद केलं आहे की सहारणपूर येथील गंगोह ठाणा भागातील कुंडाकलां गावात एक माणूस जैश ए मोहम्मद आणि तहरीक ए तालिबान यांच्यापासून प्रभावित होऊन फिदायिन हल्ल्याची तयारी करत होता. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याचं नाव मोहम्मद नदीम असल्याचं कळतं आहे. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. नुपूर शर्मांच्या हत्येचा कट रचल्याचं त्याने सांगितलं.
या दहशतवाद्याच्या फोन तपासण्यात आला त्यामध्ये एक डॉक्युमेंट मिळालं. त्याचं शीर्षक Explosive Course Fidae Force असं होतं. मोहम्मद नदीमच्या फोनमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधल्या दहशतवाद्यांच्याशी केलेले चॅट आणि ऑडिओ संदेशही मिळाले आहेत.
ADVERTISEMENT