Jalgaon Train Accident : "चहा वाल्यानं सांगितलं आग लागली, म्हणून लोकांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या"

Jalgaon Train Eyewitnesses: चहावाल्यानं जनतेला &$%या बनवलं असं म्हणत प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती दिली. एकूणच या घटनेच्या मुळाशी चहावाल्यानं दिलेली एक चुकीची माहिती असल्याचं समोर आलं.

Mumbai Tak

मुंबई तक

23 Jan 2025 (अपडेटेड: 23 Jan 2025, 11:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात

point

रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू

point

प्रत्यक्षदर्शींनी चहा वाल्यावर केले आरोप

Jalgaon Train Accident News:  जळगावमध्ये काल 4:30 च्या सुमारास परधाडे रेल्वे स्टेशनच्या जवळ दुर्घटना झाल्याने एकच खळबळ उडाली. जळगावहून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. पण, दुर्देवाने समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, 40 प्रवाशांना उपचारासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमधील प्रत्यक्षदर्शींनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Afghan National in Mumbai : 18 वर्षांपासून मुंबईत राहत होता अफगाणी नागरिक, कोर्टाकडून 11 महिने तुरूंगवासाची...

चहावाल्याने सांगितलं की, रेल्वेमध्ये आग लागली. तेव्हा सगळे लोक घाबरले आणि चैन ओढली. त्यानंतर ट्रेन थांबली तेव्हा लोकांनी धावपळ सुरू केली. जिकडून रेल्वे ट्रॅक होता, तिकडून कमी लोक उतरले. दुसऱ्या बाजूने जास्त लोक उतरले. ट्रॅकवरुन उतरलेले अनेकजण पुष्पक एक्सप्रेस खाली आले, पण मोटरमनने ब्रेक लावल्यामुळे अनेकजण वाचले. जर पूर्ण गाडी पास झाली असती, तर कित्येक लोकांचा मृत्यू झाला असता. चहावाल्यानं जनतेला &$%या बनवलं असं म्हणत प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिकची तब्बेत बिघडली, कडेकोट बंदोबस्तात मध्यरात्री कारागृहातून थेट रुग्णालयात हलवलं

आमच्यासोबत असलेल्या एकाला आम्ही शोधलं, तेव्हा त्याचा शीर तुटलेलं होतं असंही प्रत्यशक्षदर्शी म्हणाले आहेत. एकूणच या घटनेच्या मुळाशी चहावाल्यानं दिलेली एक चुकीची माहिती असल्याचं समोर आलं असून, यामुळे आता या चहावाल्याचा शोध घेतला जात आहे.
 

    follow whatsapp