Manoj Jarange यांच्या मेहूण्यावर तडीपारीची कारवाई, कोण आहे विलास खेडकर? वाळू तस्करी, जाळपोळ....

मनोज जरांगे यांच्या मेहूणा विलास खेडकर याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसंच इतर तीन जणही जरांगेंच्या ताफ्यात सोबत दिसले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

09 Feb 2025 (अपडेटेड: 09 Feb 2025, 12:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांवर कारवाई?

point

मेहूणा विलास खेडकर तीन जिल्ह्यातून तडीपार

point

पोलिसांनी कुणाकुणावर केली तडीपारीची कारवाई?

Jalna Police Action : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण ढवळून निघालं होतं. बीडच्या  पोलीस प्रशासनावर यावरुन अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर आता नव्यानं आलेल्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुन्हागांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानंतर आता जालन्याचे पोलीसही अॅक्शन मोडवर आले आहेत. जालन्यात कायदा व सुव्यस्था कायम राहावी या हेतून आता बीडमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्यांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मनोज जरांगे यांचे काही नीकटवर्तीय आणि नातेवाईकही असल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 9 जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. वामन मसुरराव तौर, रामदास मसुरराव तौर (दोन्ही रा. शिवनगाव ता. घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा. अंबड), गोरख बबनराव कुरणकर (रा. कुरण), अमोल केशव पंडित (रा. अंकुशनगर), गजानन गणपत सोळुंके, संयोग मधुकर सोळुंके (रा. गोंदी), विलास हरिभाऊ खेडकर (रा. गंधारी) आणि केशव माधव वायभट (रा. अंकुशनगर, ता. अंबड) अशी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 9 आरोपींची नावं आहेत.

हे ही वाचा >> MNS Vs Ajit Pawar : "अजित पवारांनी स्वत:च्या जीवावर लढावं आणि मग बोलावं, भाजपचा पदर धरून..."

मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर, सुयोग सोळुंके, गजानन सोळुंके या तिघांचाही या यादीत समावेश असून, हे मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या आरोपींवर अवैध वाळू उत्खनन, जाळपोळ, धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

विलास हरिभाऊ खेडकर मनोज जरांगे यांचा मेहुणा 

1)2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
2)2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू  चोरी प्रकरणी गुन्हा.
3)2023 साली जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये  गुन्हा दाखल.
4)2023 रोजी  पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी  गोंदी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

सुयोग सोळुंकेवर कोणते गुन्हे?

हे ही वाचा >> Chandrapur : गावात बिबट्या शिरला, धुमाकूळ घातला, 5 जण जखमी; आठ तासांच्या प्रयत्नानंतर पत्रे, जाळी लावून पकडलं

1)2012-पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीला धमकावून मारहाण तसेच पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम 307 आणि 353 गुन्हा-
2) 2020-साली दुचाकी ची धडक देऊन मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा.
3)2023 साली -गोदावरीतून 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल 
4)2025 साली, स्वतःच्या मालकीच्या हायवा मधून वाळू चोरी केल्याचा गुन्हा.

गजानन सोळुंकेवर कोणते गुन्हे?

1) 2012 -पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचे प्रकरण, 
फिर्याद देण्यात आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी,कलम 307 आणि 353
2)2019--आरोपीकडून सहकाऱ्यांशी आपापसात मारहाण, कलम 324
3)2023 या  काळात गोदावरी मधून 100 ब्रास वाळू चोरी, केल्याचा गुन्हा दाखल .
4) 2023 अवैध वाळू उत्खनन आणि चोरी प्रकरणी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल.

    follow whatsapp