Jitendra Awhad : ."..तर हिमालयात जाऊन साधूसंत व्हा आणि वाल्मिकलाही माफ करा"; आव्हाड सुरेश धसांवर बरसले

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. "विशेष दुत ह्यांनीं जाणीव पूर्वक हा लॉंग मार्च चिरडला. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे. हा प्रश्न धसास लावणार दलाल कोण ?" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे लाँग मार्च थांबवताना सरकारच्या वतीने मध्यस्थी करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.

Mumbai Tak

मुंबई तक

10 Feb 2025 (अपडेटेड: 10 Feb 2025, 02:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश धश यांच्याविरोधात आक्रमक

point

जितेंद्र आव्हाड 'त्या' वक्तव्यावरुन संतापले

point

लाँग मार्च थांबवताना सुरेश धस काय म्हणाले?

Jitendra Awhad Vs Suresh Dhas : परभणीमध्ये दोन महिन्यांपूर्वी सोमनाथ सुर्यवंशी या कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. यानंतर आंबेडकरी अनुयायांनी आक्रमक होत सोमनाथला न्यायाची मागणी करत मुंबईकडे लाँग मार्च काढला. हा लाँग मार्च नाशिकमध्ये सुरेश धस आणि मेघना बोर्डीकर यांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्यात आला. त्यावेळी सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी धस यांच्यावर निशाणा साधलाय. दुसऱ्याच्या घरातल्या माणसाचा खून झाला तर तिसऱ्याने येऊन जाऊ द्या, त्याला माफ करा हे बोलणं सोपं असतं असं म्हणत आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?  

हे ही वाचा >> Manoj Jarange : "...तर तुमचा कार्यक्रम लावायला वेळ लागणार नाही", एकेरी उल्लेख करत CM फडणवीस यांच्यावर टीका

"दुसर्‍याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसर्‍याने येऊन, "जाऊ द्या, त्याला माफ करा", हे बोलणे खूप सोपे असते. पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल, हेही जर बोलणार्‍यास कळू नये याला काय म्हणावे. सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते. अर्थात,  हा ज्याचा - त्याचा विचार आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलंय, त्यांना कायद्याचा मार बसेलच; याची खात्री आम्ही देतो. एवढेच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिक कराडलाही  माफ करावे. 
सोमनाथ सुर्यवंशी छोट्या समाजाचा, मागे पाठबळ नाही, म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावे, ही भावनाच मूळात वर्णवर्चस्ववादी आहे. खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही. हा खूनच आहे... अक्षय शिंदेचा खूनच आहे; सोमनाथ सुर्यवंशीचा खूनच आहे आणि संतोष देशमुखचाही खूनच आहे. तिघांच्याही खुनाला माफी नाही." 

 

हे ही वाचा >> Suresh Dhas : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार? सुरेश धस म्हणाले, "अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे..."

जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केलं असून, त्यामध्ये ते म्हणाले "परभणी लाँग मार्च का थांबला, 17 जानेवारी 2025 रोजी परभणी शहरातून तब्बल 400 किलोमीटर अंतर पार करत निघालेला हा मार्च नाशिकमध्ये संपला. विशेष दुत ह्यांनीं जाणीव पूर्वक हा लॉंग मार्च चिरडला. सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे. हा प्रश्न धसास लावणार दलाल कोण ?" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे लाँग मार्च थांबवताना सरकारच्या वतीने मध्यस्थी करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला.



 

    follow whatsapp