Jitendra Awhad on Walmik Karad : बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि त्यांच्याशी संबंधीत असलेल्या खंडणी प्रकरणात फरार वाल्मिक कराडचा पोलीस शोध घेत आहेत. CID कडून या प्रकरणाचा तपास केला जात असतानाच, आता वाल्मिक कराड शरण येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वाल्मिक कराडचं शेवटी पुण्यात लोकेशन ट्रेस झाल्याचं समोर आल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलच एक ट्विट करत नवी माहिती समोर ठेवली आहे. वाल्मिक कराड आज दिवसभरात पोलिसांच्या स्वाधीन होईल अशी माहिती निकटवर्तीयांकडून मिळाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
हे ही वाचा >> Beed: 'धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाका...', कोणी केली थेट हायकोर्टात याचिका?
"आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता." असं आव्हाड म्हणाले.
हे ही वाचा >> Sandhy Sonawane : Walmik Karad यांच्याशी काय संबंध? CID चौकशी का झाली? संध्या सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं
आव्हाड पुढे बोलताना आरोपीकडे बोट करत म्हटलं की, "तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती. अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही."
ADVERTISEMENT
