आमदार तानाजी सावंत यांच्या गौप्यस्फोटावर कैलास पाटलांचे पुराव्यासह उत्तर

मुंबई तक

• 12:30 PM • 23 Jun 2022

उस्मानाबाद: उस्मानाबादच्या कळंबचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली आहे. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली होती. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा कैलास पाटलांचा दावा साफ खोटा आहे. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत हे […]

Mumbaitak
follow google news

उस्मानाबाद: उस्मानाबादच्या कळंबचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली आहे. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली होती. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा कैलास पाटलांचा दावा साफ खोटा आहे. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. डबल ढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्या पासून पक्ष प्रमुख यांनी देखील सावध राहावं असे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले होते. आता त्याला कैलास पाटलांनी पुराव्यासह उत्तर दिले आहे.

हे वाचलं का?

कैलास पाटलांनी ज्या ट्रकसोबत प्रवास केला, त्या ट्रकच्या ड्रायव्हरसोबतचा फोटो त्यांनी समोर आणला आहे. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जर परतीच्या प्रवासासाठी माझी व्यवस्था केली असेल तर त्यांनी त्या संदर्भातचे पुरावे किंवा गाडी नंबर द्यावा. मला पावसात भिजत असताना ज्या ट्रक ड्राइव्हरने लिफ्ट दिली मी उतरल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी देखील काढला आणि ट्रकचा नंबर देखील घेतला आहे. ट्रक ड्राइव्हरचं नाव मोहंमद अनस असे असून तो उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचा आहे, त्याला कधीही संपर्क करू शकतात अशी प्रतिक्रिया कैलास पाटलांनी मुंबई तकशी बोलताना दिली आहे.

तानाजी सावंत हे गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटासोबत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत असलेले दोन आमदार आतापर्यंत महाराष्ट्रात परत आले आहेत. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि कबंळचे आमदार कैलास पाटील हे दोघे महाराष्ट्रात परतले आहेत. नितीन देशमुखांनीही गंभीर आरोप केला आहे. मला पकडून माझ्या दंडात इंजेक्शन दिले म्हणून बेशुद्ध झालो. त्यानंतर मला एका खोलीत ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा करुन मी तिथून बाहेर पडलो असे स्वत: नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.

नितीन देशमुखांच्या आरोपावरती एकनाथ शिंदेंच्या गटातून स्पष्टीकरण दिले आहे. नितीन देशमुखांना एका स्पेशल विमानाने नागपूरला पोहोचवण्यात आले. बायकोला, मुलांना भेटायचा आहे असे त्यांनी सांगितले. लगेच एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांची व्यवस्था केली असे एकनाथ शिंदे गटाने सांगितले आहे.

    follow whatsapp