चाकूचा धाक दाखवून रेल्वे प्रवाशाला लुबाडलं, दोन तासांत चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश

मुंबई तक

• 10:32 AM • 31 Mar 2022

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पहाटेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाईल लुबाडल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरून आरोपीचा तपास करुन अवघ्या दोन तासांत त्याला जेरबंद केलं आहे. कल्याणच्या बैलबाजार परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली असून, मोनू चाळके अस या आरोपीचे […]

Mumbaitak
follow google news

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पहाटेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाईल लुबाडल्याची घटना बुधवारी घडली होती. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरून आरोपीचा तपास करुन अवघ्या दोन तासांत त्याला जेरबंद केलं आहे.

हे वाचलं का?

कल्याणच्या बैलबाजार परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली असून, मोनू चाळके अस या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीसानी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक नंबर प्लॅटफॉर्मवरुन काही अंतरावर रुळावरून एक प्रवाशी काल पहाटे च्या सुमारास  घरी परतत होता. अंधाराचा फायदा घेत आरोपी याठिकाणी दबा धरून बसला होता. अचानक या चोरट्याने प्रवाशाला पकडून, त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी प्रवाशाने लगेचच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Crime: अहमदाबादमधील मराठी कुटुंबातील 4 जणांच्या हत्येचं रहस्य अखेर उलगडलं!

प्रवाशाने या चोरट्याचं वर्णन पोलिसांना सांगितलं या वर्णनाच्या आधारे  रेल्वे पोलिसांच्या पथकाने या चोरट्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी अवघ्या दोन तासात या चोरट्याला कल्याण मधील बैलबाजार परिसरातून अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू व चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

खळबळजनक घटना : तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

    follow whatsapp