अभिनेते कमल हासन यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात करण्यात आलं दाखल

मुंबई तक

• 03:48 AM • 24 Nov 2022

सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नईतल्या श्री रामचंद्र मेडिकल सेंटर या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २३ नोव्हेंबरला रात्री कमल हासन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ताप आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. […]

Mumbaitak
follow google news

सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नईतल्या श्री रामचंद्र मेडिकल सेंटर या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २३ नोव्हेंबरला रात्री कमल हासन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ताप आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर आज त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

हे वाचलं का?

कमल हासन यांना बुधवारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं

कमल हासन यांना आज रूग्णालायतून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच त्यांनी हैदराबादमध्ये त्यांचे गुरू आणि दिग्गज दिग्दर्शक के विश्वनाथ यांची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना थोडा ताप आला. ते हैदराबादमध्ये होते. तिथून परतल्यानंतर त्याना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यनुसार अभिनेत्याला दोन दिवसांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. कमल हासन सध्या बिग बॉस तामिळ सीझन ६ चे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे ६ सीझन होस्ट केले आहेत. सध्या ते याच कार्यक्रमात व्यग्र होते.

कमल हासन गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. बुधवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. कमल हासन त्यांना गुरू मानतात. कमल हासन आणि के. विश्वनाथ यांनी तीन तेलुगू चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

कमल हासन यांचा काही दिवसांपूर्वीच ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या ते ‘इंडियन 2’ या तमिळ चित्रपटावर काम करत आहेत.

फेब्रुवारी 2020 मध्ये सेटवरील एका अपघातानंतर ‘इंडियन 2’ या चित्रपटाचं शूटिंग रखडलं होतं. या अपघातात तिघांचा मृत्यू आणि 10 जण जखमी झाले होते. शूटिंगदरम्यान क्रेन पडल्याने ही दुर्घटना झाली होती. जवळपास दोन वर्षांनंतर सप्टेंबरपासून शूटिंगला सुरुवात झाली

    follow whatsapp