काँग्रेस बुडाली, तर देशही बुडेल; कन्हैया कुमारने सांगितलं काँग्रेस प्रवेशाचं कारण

मुंबई तक

• 01:01 PM • 28 Sep 2021

मंगळवारचा दिवस काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला. मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेस प्रवेश केला. या दोघांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस बुडाली तर देश बुडेल असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे. काय म्हणाला कन्हैय्या कुमार? मला असं वाटतं की या देशात काही लोक हे फक्त लोक नाहीत तर विचार […]

Mumbaitak
follow google news

मंगळवारचा दिवस काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला. मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेस प्रवेश केला. या दोघांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस बुडाली तर देश बुडेल असं वक्तव्य कन्हैय्या कुमारने केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाला कन्हैय्या कुमार?

मला असं वाटतं की या देशात काही लोक हे फक्त लोक नाहीत तर विचार आहेत. या देशाची चिंतन परंपरा, संस्कृती, मूल्यं, इतिहास आणि वर्तमान बदलण्याचा त्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी कुठे तरी वाचलं होती की तुम्ही तुमचा शत्रू निवडा, मित्र आपोआप बनत जातील. मी ती निवड आता केली आहे. जर काँग्रेस बुडाली तर देशही बुडेल हा विचार माझ्या मनात आला त्यामुळे लोकशाही मानणाऱ्या या पक्षात मी प्रवेश केला आहे असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं आहे.

देशाचे पंतप्रधान आताही आहेत, आधीही होते. आज मी जेव्हा राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अर्ज भरत होतो तेव्हा माझा मित्र जिग्नेश मेवाणी याने मला महात्मा गांधी, आंबेडकर आणि भगत सिंग यांचे फोटो आणि भारतीय घटनेची प्रत दिली. आज आपल्या देशाला गांधी-आंबेडकरांचया विचारांची आणि भगत सिंग यांच्या विचारांची गरज आहे.

काँग्रेस हा देशातला जुना-जाणता पक्ष आहे. सध्या हा पक्ष विरोधी पक्षात आहे. मात्र मोठं जहाज वाचवलं नाही तर लहान लहान होड्याही बुडतील. मी ज्या पक्षातून आलो त्या पक्षाने मला घडवलं, माझ्यावर संस्कार केले. माझ्यातली लढाऊ वृत्ती जोपासली. त्या पक्षाला मी लाख लाख धन्यवाद देतो. मी त्या लोकांचेही धन्यवाद देतो जे कोणत्याही पक्षाचे नव्हते. पण जेव्हा कोणत्या पक्षाने आमच्या विरोधात चुकीचे आरोप लावले तेव्हा ते लोक सोशल मीडियावर आमच्यासाठी भांडले. मी सगळ्यांचा आभारी आणि सगळ्यांचा ऋणी आहे असं कन्हैय्याने म्हटलं आहे.

काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा आणि लोकांचा संघर्ष समोर आणण्याची प्रेरणा आम्हाला या पक्षाकडून मिळेल अशी आशा आहे. यावेळी कन्हैय्याने संघावरही टीका केली. आपलं कुटुंब सोडायचं आणि संघात जायचं या धोरणाला काय अर्थ आहे असा प्रश्न कन्हैय्याने उपस्थित केला.

Congress पक्ष नव्या उभारीसाठी आता कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणींसारख्या तरूण तुर्कांच्या शोधात!

जिग्नेश मेवाणी काय म्हणाले?

सत्ताधारी जे वागत आहेत ती कहाणी गुजरातपासून सुरू आहे. 6-7 वर्षांमध्ये गुजरातमध्ये जी अनागोंदी माजली आहे ती तुम्हाला दिसते आहेच. आपल्या घटनेवर, आपल्या अधिकारांवर, हक्कांवर हल्ला होतो आहे. आयडिया ऑफ इंडिया या संकल्पनेवर हल्ला केला जातो आहे. लोकशाहीवर हल्ला होतो आहे. एक भाऊ दुसऱ्याचा शत्रू होत चालला आहे. सूडाचं राजकारण नागपूर (संघ मुख्यालय याच ठिकाणी आहे) आणि दिल्ली पसरवत आहे. ज्या काँग्रेसने इंग्रजांना हुसकावलं त्याच काँग्रेससोबत मी आज उभा आहे याचा मला अभिमान आहे असंही जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp