प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया याला आज मुंबई पोलिसांनी अटक केली. अभिनेत्रा कपिल शर्मा फसवणूक प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
द कपिल शर्मा शो फेम अभिनेता कपिल शर्माने गेल्या वर्षी कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरुद्धात तक्रार दिली होती. दोघांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप कपिल शर्माने तक्रारीत केला होता. कपिल शर्माच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या गुन्हेे शाखेनं गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलीप छाब्रिया यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया याला अटक केली आहे. शनिवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
आर्थिक फसवणुकीचं हे प्रकरण गेल्या वर्षी समोर आलं होतं. अभिनेता कपिल शर्माने मुंबई गुन्हे पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रारीत त्याने पोलिसांना सांगितलं की, मार्च ते मे २०१७ या कालावधीत दिलीप छाब्रिया डिझाईन्स प्रा. लि.चे मालक दिलीप छाब्रिया यांना ५.३ कोटी रुपये दिले.
व्हॅनिटी बसची डिझाईन तयार करण्यासाठी त्याने ही रक्कम दिली होती. मात्र, २०१९ पर्यंत व्हॅनिटी व्हॅनच्या डिझाईनबद्दल कोणतंही काम झालं नसल्याचं कपिल शर्माच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल या विधी प्राधिकरणाकडे धाव घेतली. सुरुवातीची सुनावणी झाल्यानंतर विधी प्राधिकरणाने छाब्रियांची बँक खाती गोठवण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, मागच्याच वर्षी छाब्रियांनी कपिल शर्माला १.२० कोटींचं पार्किंग बील पाठवलं. जिथे व्हॅनिटी व्हॅन तयार केली जाणार आहे. त्यानंतर कपिल शर्मा याने मुंबई पोलिसांत धाव घेतली. सप्टेंबर २०२० मध्ये कपिल शर्माने पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे छाब्रियांविरुद्ध तक्रार दिली होती.
या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात असतानाच गुन्हे शाखेनं छाब्रियांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक केली होती.
ADVERTISEMENT