Mother’s Day : तैमूर-जेहसोबत करीना कपूरची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, फॅन्स म्हणाले….

मुंबई तक

• 12:08 PM • 08 May 2022

करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) मदर्स डेच्या निमित्ताने (Mother’s Day 2022) आपल्या दोन्ही मुलांसह पूलमध्ये मस्ती करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं मुलांसहचं बॉन्डिग खूप छान दिसतं आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तैमूर आणि जेह सोबत स्विमिंगपूलमध्ये मस्ती करीना कपूरने तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह यांच्यासोबत एक खास […]

Mumbaitak
follow google news

करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) मदर्स डेच्या निमित्ताने (Mother’s Day 2022) आपल्या दोन्ही मुलांसह पूलमध्ये मस्ती करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं मुलांसहचं बॉन्डिग खूप छान दिसतं आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

तैमूर आणि जेह सोबत स्विमिंगपूलमध्ये मस्ती

करीना कपूरने तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह यांच्यासोबत एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीना तिच्या लाडक्या तैमूर आणि जेह सोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसते आहे. तिच्या दोन्ही लहान मुलांसह तिचं जे बॉन्डिग आहे त्यामुळे चाहत्यांना हा फोटो चांगलाच पसंतीस पडतो आहे. आपल्या दोन्ही मुलांना आपल्या कुशीत घेऊन त्यांच्यासोबत खेळताना दिसते आहे. तसंच तैमूर आणि जेह हे दोघेही पूलमध्ये एँजॉय करत आहेत. स्विमिंग पूलमधला हा फोटो शेअर करत करीनाने म्हटलं आहे की मेरी जिंदगी की लेंथ और ब्रेथ असं कॅप्शन देत हॅपी मदर्स डे असं म्हटलं आहे.

करीनाच्या फोटोवर चाहते खुश

तैमूर आणि जेह सोबत करीनाचा हा फोटो नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तसंच कमेंट सेक्शनमध्येही अनेक लोक कमेंट करून करीनाचं कौतुक करत आहेत. करीना कपूरची मोठी बहीण आणि अभिनेत्री करीश्मा कपूरनेही हार्ट इमोजी काढत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तसंच एका फॅनने या फोटोवर माशाअल्लाह अशी कमेंट केली आहे. तर आणखी एक युजर म्हणतो आहे सुंदर कुटुंब

करीना कपूरला तैमूरच्या फोटो आणि नावावरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकदा करीना कपूरला या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र यावेळी तिच्या फोटोचं कौतुक करण्यात येतं आहे. तिचा हा फोटो खूप खास आहे असंच बहुतांश नेटकरी म्हणत आहे.

    follow whatsapp