Karuna Sharma यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, आता पुढील सुनावणी 18 तारखेला

मुंबई तक

• 08:06 AM • 14 Sep 2021

परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि 8) अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.त्यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार होती.मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे त्या न्यायधीश रजेवर असल्याने आणि फिर्यादी पक्ष हजर नसल्याने दि.18 […]

Mumbaitak
follow google news

परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि 8) अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.त्यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार होती.मात्र ज्या न्यायालयासमोर ही सुनावणी होणार आहे त्या न्यायधीश रजेवर असल्याने आणि फिर्यादी पक्ष हजर नसल्याने दि.18 तारखेला सुनावणी होणार आहे.

हे वाचलं का?

रविवारी म्हणजेच 5 सप्टेंबरला परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करूणा शर्मा आणि अरूण दत्तात्रय मोरे ( दोन्ही रा . मुंबई ) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते . सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती . मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली .

सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत . बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.मात्र , दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती मात्र आज न्यायाधीश आणि फिर्यादी पक्ष हजर नव्हते.

Karuna Sharma यांची बीडमध्ये एंट्री आणि निर्माण झालेले गूढ प्रश्न

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरण हे जानेवारी महिन्यात राज्यात चांगलंच गाजलं होतं. धनंजय मुंडे यांच्यावर एका मुलीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले आपले संबंध हे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना सोशल मीडियावर मान्य करावे लागले होते. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे याबाबत मीडियाने प्रसिद्धी देऊ नये या आशयाचं एक पत्रही धनंजय मुंडेंच्या वकिलांमार्फत मीडियाला पाठवण्यात आलं होतं.

करुणा शर्मा यांना अटक झाल्यानंतर पोलीस जेव्हा घेऊन जात होते तेव्हा आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोपही करूणा शर्मा यांनी केला होता. आता या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशात त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती मात्र न्यायाधीश नसल्याने आणि फिर्यादी पक्षाचं कुणीही आलं नसल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. आता याबाबत 18 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे करूणा शर्मा यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.

    follow whatsapp