अंजनेरी की किष्किंधा? आता हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद समोर

मुंबई तक

• 08:46 AM • 30 May 2022

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक अरे अंजनीच्या सुता.. असं हनुमानाचं वर्णन करण्यात आलं आहे. तसंच हनुमान चालीसाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजते आहे अशात हनुमानाच्या जन्म स्थळाचा वाद निर्माण झाला आहे. हनुमानाच्या जन्मस्थळावरून हा वाद रंगला आहे तो साधू आणि महंतांमध्येच. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

अरे अंजनीच्या सुता.. असं हनुमानाचं वर्णन करण्यात आलं आहे. तसंच हनुमान चालीसाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजते आहे अशात हनुमानाच्या जन्म स्थळाचा वाद निर्माण झाला आहे. हनुमानाच्या जन्मस्थळावरून हा वाद रंगला आहे तो साधू आणि महंतांमध्येच. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी केला आहे. त्यासाठी ते त्र्यंबकेश्वरला जाऊन आंदोलन करत आहेत.

मात्र नाशिकमधल्या काही साधू आणि महंतांनी या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. आता ३१ मे रोजी यासंदर्भात शास्त्रार्थ सभा घेतली जाणार आहे. महंत गोविंद दास यांनी हे आवाहन केलं आहे की अभ्यासक, साधू आणि महंतांनी वेद तसं पुराण या संदर्भातले पुरावे देऊन जन्मस्थळ याबाबत चर्चेला यावं.

राम जन्मभूमी, काशी, मथुरा या सगळ्यानंतर आता हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद उफाळून आला आहे. किष्किंधा येथील मठाधिपती त्र्यंबकेश्वर ठाण मांडून आहेत. हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नाही तर किष्किंधा नगरी आहे असाच त्यांचा दावा आहे. तसंच वाल्मिकी रामायणाचा दाखला देत किष्किंधा या ठिकाणी भव्य हनुमान मंदिर उभारलं जाणार आहे अशीही घोषणा करण्यात आली आहे. नाशिकच्या साधू महंतांचा मात्र याला विरोध आहे. महंत सुधीरदास हे हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरीच आहे हा दावा करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच हनुमानाच्या जन्मस्थानावरून कर्नाटक विरूद्ध आंध्र प्रदेश या दोन राज्यांमधला वादही पेटला होता. हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाला असा दावा तिरूमला तिरूपती देवस्थानने केला होता. पौराणिक आणि पुरातत्वीय पुरावांचा आधार देऊन हा निष्कर्ष काढण्यात आल्याचा दावा त्यांनी दिलेल्या अहवालात करण्यात आला होता. तर कर्नाटकचं म्हणणं हे आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळ असलेल्या किष्किंधामध्ये झाला.

किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी वाल्मिकी रामायणातले काही पुरावे आणि संदर्भ देत हनुमानाचं जन्मस्थळ अंजनेरी नसून किष्किंधा असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शृंगेरी, द्वारका येथील शंकराचार्य तसेच राम जन्मभूमी न्यासचे पूजक यांवही भेट घेऊन ह्या विषयावर 20-20 दिवस चर्चा करून ह्याविषयी त्यांना आपले म्हणणे पुराण व तुलसी रामायण संदर्भाने पटवून दिले आहे, महाराष्ट्र आणि गुजरात चा विषय असल्याने खास करून द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्याशी खास चर्चा केली असेही त्यांनी सांगितले.

वादाचे मूळ

रामायणात आणि काही ग्रंथांमध्ये हनुमान जन्मभूमीसंबंधी अंजनेरी, अंजनादरी आणि अजेंयानंदरी असे उल्लेख आहे, हे तिन्ही ठिकाण अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक शी संबंधित आहेत. कर्नाटकचा दावा आहे की हनुमानाचा जन्म हम्पी जवळील किष्किंधा येथील अंजनाद्री पर्वतात झाला आहे, तर आंध्रप्रदेश चा दावा हे की हनुमानाचा जन्म तिरुमाला च्या सात डोंगर रांगामध्ये म्हणजेच सप्तगिरी च्या अंजनाद्री किंवा अजेंयानंदरी येथे झाला आहे. महाराष्ट्रात मात्र मान्यता आहे की त्रंबकेश्वर येथिल ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगांमधील अंजनेरी पर्वतावर झाला आहे.

    follow whatsapp