MHADA lottery 2024 : म्हाडाचं घर खरेदी करायचंय? ऑनलाईन प्रक्रिया माहितीय का? म्हाडाचं प्रसिद्धीपत्रक एकदा वाचाच

मुंबई तक

18 Aug 2024 (अपडेटेड: 18 Aug 2024, 01:02 PM)

MHADA Homes Lottery 2024 Online Process : म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. म्हाडाची सोडत येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केलीय. पण ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत ज्या ग्राहकांना माहित नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

मुंबई म्हाडा लॉटरी २०२४ साठी कोणती कागदपत्रे असायला हवीत?

म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

follow google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडा सोडतीच्या ऑनलाईन प्रक्रियेबाबत जाणून घ्या सविस्तर

point

मुंबई मंडळातर्फे १९ ऑगस्ट रोजी लाईव्ह वेबिनार

point

म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

MHADA Homes Lottery 2024 Online Process : म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. म्हाडाची सोडत येणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर अनेकांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केलीय. पण ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत ज्या ग्राहकांना माहित नाही, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडाच्या जनसंपर्क विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

हे वाचलं का?

मुंबई मंडळातर्फे १९ ऑगस्ट रोजी लाईव्ह वेबिनार

म्हाडाच्या ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्जदारांना अधिक सुलभतेने अर्ज सादर करता यावा, याकरिता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजता लाईव्ह वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
 मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ०९ ऑगस्ट २०२४ पासून म्हाडाचे संकेतस्थळ https://housing.mhada.gov.in व मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा >>  ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम? अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत

म्हाडा सदनिका विक्रीची संगणकीय सोडत ही पूर्णतः ऑनलाईन असल्याने सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंडळातर्फे आयोजित वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी म्हाडाच्या सोडतीसाठी तसच यापूर्वी व सध्या चालू असलेल्या सोडतीत ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, तसेच जे नोंदणी करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जावे, असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे. 

हे ही वाचा >> Ajit Pawar: सुप्रिया सुळेंना राखी बांधणार का? अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाले?

म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

म्हाडाच्या सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे व म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर लाईव्ह वेबिनार (Live Webinar) ची Link उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज @mhadaofficial  वर या वेबिनारचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

या वेबिनारमध्ये मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, म्हाडाच्या मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके, माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी संदीप बोदेले इच्छुक अर्जदारांच्या शंकांचे निरसन करून माहिती देणार आहेत.  इच्छुक अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे, अशी माहिती म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली आहे.

    follow whatsapp