ADVERTISEMENT
कोल्हापुरातील सुभाष नगरमध्ये चर्मकार समाजातील एका कारागिरानं सुबक अशी 6 फुटी कोल्हापूरी चप्पल बनवली आहे.
55 वर्षीय राजेंद्र सातपुते यांना नागपूर इथल्या एका चप्पल विक्रेता व्यापाऱ्याची ऑर्डर गेल्या महिन्यात मिळाली.
६ फूट उंचाची आणि ४० किलो वजनी चप्पल बनवून द्यावी, अशी त्या व्यापाऱ्याने राजेंद्र सातपुते यांच्याकडे मागणी केली होती.
नंतर सातपुते यांनी भव्य दिव्य चप्पल बनवण्याचा विडा उचलला आणि काम सुरू केलं.
तब्बल एक महिना परिश्रम घेऊन त्यांनी सुबक आकर्षक दिसणारी ही अस्सल कोल्हापुरी चप्पल बनवली.
या चपलेसाठी 1 हजार रिबिट मारावे लागले. त्यावर सुरेख विविध नक्षीकाम करण्यात आलं आहे.
आज (21 मार्च) ही कोल्हापुरी चप्पल रेल्वेने नागपूर इथल्या व्यापाऱ्याकडे पाठवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT