मुंबई: ‘लता मंगेशकर’ हे नावच पुरेसे आहे. असे म्हणतात की, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे अनेक कथा आणि किस्से असतात. लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील देखील अनेक कथा आहेत ज्या आपल्याला फारशा माहित नाही. या किस्से-कहाण्यांमधून आपल्याला समजेल की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात बरंच काही गमावून काही गोष्टी मिळवल्या आहेत. अनंत अडचणींवर मात करूनच त्या जगात आपला ठसा उमटवू शकल्या.
ADVERTISEMENT
लता दीदी या संगीतविश्वातील एक आदरणीय आणि अतिशय सन्माननीय अशा गायिका होत्या. म्हणूनच चाहत्यांना त्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आहे. चला जाणून घेऊया लता मंगेशकर यांच्या आयुष्याशी निगडित अशा गोष्टी ज्या फारशा कोणालाच माहित नाहीत. लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमध्ये झाला होता. जन्माच्या वेळी त्यांचे नाव हेमा असं होते. पण पुढे त्यांच्या वडिलांनी दीनानाथ यांनी ‘भावबंधन’ नाटकातील स्त्री पात्राने प्रभावित होऊन आपल्या मुलीचे नाव ‘लता’ असं ठेवले.
लता मंगेशकर लहानपणापासूनच घरच्या जबाबदार मुलगी होत्या. संगीत आणि नाटक ही कला त्यांना वारसा हक्काने लाभली होती. त्यांनी वडील दीनानाथ यांच्यासोबत संगीत नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली जेव्हा त्या अवघ्या पाच वर्षांच्या होत्या. याशिवाय त्यांनी त्यांच्या आजीकडून काही लोकगीतंही शिकली होती.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, लतादीदी त्यांच्या हयातीत फक्त एक दिवस अभ्यासासाठी शाळेत गेल्या होत्या. असे म्हणतात की, लता मंगेशकर यांना शाळेत मुलांना गाणे शिकवायचे होते. पण शाळेच्या शिक्षिकेला त्यांची ही गोष्ट आवडली नाही. लता दीदी यांना जे करायचे ते करू दिले नाही. त्यामुळे लताजींनी शाळेत जाणे बंद केले होतं. दुसरीकडे असंही म्हटलं जातं की, लता मंगेशकर यांना त्यांची धाकटी बहीण आशा भोसले यांना शाळेत घेऊन जायचे होते, पण तसे होऊ शकलं नाही. यामुळेच त्यांनी शाळा सोडली.
1942 मध्ये वडील दीनानाथ यांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. वयाच्या 13व्या वर्षीच घर चालवण्याची अत्यंत मोठी जबाबदारी लता दीदींवर आली. येथूनच त्यांनी गायन आणि अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यास सुरुवात केली.
‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
1945 साली लता मंगेशकर यांना मास्टर विनायक यांनी ‘बडी माँ’ या चित्रपटात छोटी भूमिका देऊ केली. पण लताजींना गाण्यात जास्त रस होता, म्हणून त्यांनी त्याच वर्षी उस्ताद अमन अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.
असं म्हणतात की, कधीकधी नकार देखील तुमच्या आयुष्यात आनंद आणतो. लता मंगेशकर यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांचा आवाज नाकारला गेला. पण लतादीदींना माँ सरस्वतीच्या आशीर्वादाची साथ होती. त्यामुळेच 1949 साली लता दीदींनी महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ गाण्याला आपला आवाज दिला. त्यांनी हे गाणं इतकं सुंदर पद्धतीने गायलं होतं की ऐकणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला होता.
‘आकाशात सूर्य आहे चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे,’ असं का म्हणाले होते पु.ल. देशपांडे? वाचा…
स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवणाऱ्या लतादीदींनी कुटुंबामुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत अविवाहित राहणंच पसंत केलं. आपल्या गायनाने लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी उत्तमोत्तम गाणी गाऊन भारताचे नाव जगभर केलं.
ADVERTISEMENT