Chandrapur : गावात बिबट्या शिरला, धुमाकूळ घातला, 5 जण जखमी; आठ तासांच्या प्रयत्नानंतर पत्रे, जाळी लावून पकडलं

बिबट्या गावात घुसला आणि अंगणात काम करणाऱ्या एका महिलेवर हल्ला केला. तसंच शेतात असलेल्या एका महिलेवर काम करतानाच  दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. काही वन विभागाचे कर्मचारीही यावेळी जखमी झाले.

Mumbai Tak

मुंबई तक

09 Feb 2025 (अपडेटेड: 09 Feb 2025, 10:43 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरमध्ये गावात बिबट्या घुसल्यानं मोठा धुमाकूळ

point

धूमनखेडा गावात तब्बल 8 तास चालला रेस्क्युचा थरार

point

गावातील लोक छतावर चढले, वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले

Chandrapur Leopard Attack : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तहसीलमधील धूमनखेडा गावात एका बिबट्या घुसला. बिबट्या आल्यानं एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच ग्रामस्थ आणि वन विभागाचा एक कर्मचारी जखमी झाल्याची  माहिती आहे. एका बिबट्यानं वनरक्षकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Saif Ali Khan : सैफच्या हल्ल्याला महिना पूर्ण झाल्यानंतर करीनाची पोस्ट; म्हणाली, लग्न, मुलं, घटस्फोट...

बिबट्या आल्यानंतर शेतात असलेल्या एका महिलेवर काम करतानाच  दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर बिबट्या गावात घुसला आणि अंगणात काम करणाऱ्या एका महिलेवर हल्ला केला. हल्ल्यात ती महिलाही गंभीर जखमी झाली. महिलेला वाचवण्यासाठी धावणाऱ्या दोन लोकांनाही बिबट्याने जखमी केलं. 

गावात घुसलेला बिबट्या एका गोठ्यातही शिरला आणि तिथेच लपला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी गावात पोहोचले आणि बिबट्याला पकडण्यासाठी गोठ्यावर जाळं टाकलं. पण जाळी लावली जात असताना अचानक बिबट्या बाहेर आला आणि त्याने वनकर्मचारी नितेश सहारे यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे ते जखमी झाले. 

हे ही वाचा >> जेवण खाली पाडलं म्हणून एका तरुणाची हत्या, नेमकं प्रकरण काय?

शेवटी, गोठ्याला टिनच्या पत्र्यांनी झाकण्यात आलं आणि बिबट्यावर इंजेक्शन डॉट मारून पकडण्यात आलं. त्यानंतर सर्व जखमींना नवरगाव प्राथमिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

सुषमा बनसोड, देवानंद बनसोड, चंद्रभान बनसोड, जयश्री बनसोड आणि रवी शेंडे अशी जखमी ग्रामस्थांची नावं आहेत. 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आलं. बिबट्याला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    follow whatsapp