Munawar Faruqui girlfriend : लॉक अप विजेता मुनव्वर फारुकीची गर्लफ्रेंड कोण आहे?

मुंबई तक

• 08:35 AM • 10 May 2022

स्टॅण्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी कंगना रणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप विनर या रिआलिटी शोचा विजेता ठरला. विजेतेपद जिंकल्यानंतर फारुकीने प्रेमाची कबुलीही दिली. ‘लॉक अप’ या शोमध्ये मुनव्वर फारूकी आणि सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अंजली अरोरामध्ये केमिस्ट्री बघायला मिळाली होती. पण, विजेतेपद जिंकल्यानंतर फारूकीने सगळ्यांनाच धक्का दिला. रिआलिटी शोचे विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारूकीने जोरदार […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

स्टॅण्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकी कंगना रणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप विनर या रिआलिटी शोचा विजेता ठरला. विजेतेपद जिंकल्यानंतर फारुकीने प्रेमाची कबुलीही दिली.

‘लॉक अप’ या शोमध्ये मुनव्वर फारूकी आणि सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अंजली अरोरामध्ये केमिस्ट्री बघायला मिळाली होती. पण, विजेतेपद जिंकल्यानंतर फारूकीने सगळ्यांनाच धक्का दिला.

रिआलिटी शोचे विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारूकीने जोरदार सेलिब्रेशन केलं. त्याचबरोबर त्याने एका मुलीसोबतचा फोटोही शेअर केला.

मुनव्वर फारूकीसोबत दिसलेल्या या मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे मुनव्वरसोबत दिसणारी ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.

मुनव्वर फारूकी सोबत दिसलेली ही मुलगी आहे नाजिला सीताशी. मिळालेल्या माहितीप्रमाणे नाजिला सीताशी एक मॉडेल आहे.

नाजिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबरही आहे.

मुनव्वरने नाजिला सीताशीचा चेहरा त्यांच्या चाहत्यांना दाखवला नाही. मात्र, त्यांच्या या सेलिब्रेशन पार्टीत सहभागी झालेल्यांनी तिचा फोटो शेअर केला.

लॉक अप रिआलिटी शो मधील स्पर्धक प्रिन्स नरुला, मंदाना करीमी, सायशा शिंदे आणि मुनव्वर फारूकी नाजिला सीताशी सोबत पोझ देताना दिसले.

शिवम शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुनव्वर आणि नाजिला सोबत डान्स करताना दिसत आहे.

नाजिला सीताशी २० वर्षांची असून, ती मूळची ओमानमधील मस्कत शहराची रहिवासी आहे. काही वर्षापूर्वी ती पुण्यात शिफ्ट झाली होती.

नाजिला सीताशी टिक टॉक आणि इन्स्टाग्राममुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.

२०२० मध्ये नाजिला सीताशीने युट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातून ती पर्यटन, फॅशन आणि फूड याबद्दल माहिती देणारे व्हिडीओ करते.

नाजिला सीताशी आणि मुनव्वर फारुकी यांची पहिली भेट नेमकी कधी झाली, याबद्दलची माहिती नाही.

लॉक अप शो दरम्यान मुनव्वरने तिचं कौतुक केलं होतं. ‘कठीण काळात नाजिला नेहमीच सोबत राहिली,’ असं तो म्हणाला होता.

मुनव्वर म्हणाला होता की, लॉक अप शो संपल्यानंतर तो त्यांच्या गर्लफ्रेंडची ओळख करून देईल. ते त्याने केलंही.

मागील दीड वर्षांपासून पत्नीपासून दूर राहत असलेल्या मुनव्वर फारुकीचा घटस्फोट असून प्रलंबित आहे.

    follow whatsapp