Maharashtra Unlock News : पुण्यातले निर्बंध शिथील, जाणून घ्या काय सुरु राहणार आणि काय बंद?

मुंबई तक

• 05:40 AM • 01 Jun 2021

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी येत असल्यामुळे काही ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी राज्य सरकार काही प्रमाणात सवलती देणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या काही दिवसांमधली पुण्यातली रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे पुण्यातले लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी येत असल्यामुळे काही ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी राज्य सरकार काही प्रमाणात सवलती देणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या काही दिवसांमधली पुण्यातली रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे पुण्यातले लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

जाणून घ्या पुण्याच्या निर्बंधांमध्ये काय सवलत देण्यात आली आहे?

१) पुण्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दोन पर्यंत सर्व प्रकारची दुकानं उघडी राहतील.

२) शनिवार – रविवार या दोन दिवसांत सकाळी सात ते दोन या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडी राहतील, बाकी सर्व दुकानं बंद राहतील.

३) मद्यविक्रीची दुकानं सकाळी सात ते दोन या वेळेत सुरु राहतील.

४) शहरातील सर्व बँका या कामाच्या दिवशी सुरळीत सुरु राहणार आहेत.

या गोष्टींमध्ये बदल किंवा सवलत नाही –

१) दुपारी ३ वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

२) हॉटेल, जिम बंद राहणार

३) PMT सेवाही बंद राहणार

४) रेस्टरॉरंट, बार, हॉटेल यांची पार्सल सेवा फक्त सुरु राहील.

काल दिवसभरात पुण्यात १८० कोरोनाबाधितांची नोंद झाली. दुसऱ्या लाटेतली पुणे शहरातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दुसरीकडे पुणे शहराला लागू असलेल्या पिंपरी-चिंचवड भागात काय सुरु राहणार आणि काय बंद याचा आढावा घेऊयात…

१) अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी सात ते दोन पर्यंत सुरु राहतील

२) सर्व बँका खुल्या राहतील

३) हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री, खानावळ यांच्या फक्त घरपोच पार्सल सेवा सुरु राहतील

४) मद्यविक्रीची दुकानं सकाळी ७ ते २ या वेळेत सुरु राहतील.

५) ई-कॉमर्स सेवेमार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घरपोच करण्याची मूभा

६) कृषी संबंधित सर्व दुकानं सकाळी ७ ते २ पर्यंत सुरु राहतील.

७) दुपारी ३ नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

    follow whatsapp