Parliament Winter Session 2023 : देशाच्या संसदेवर 22 वर्षापूर्वी दहशतवादी हल्ला (terrorist attack) झाला होता, त्या हल्ल्यातील मृतांना सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच लोकसभेचं (Lok Sabha) कामकाज चालू असतानाच दोघा तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट घुसखोरी करत खासदारांच्या टेबलवर उडी मारली. त्यांच्या घुसखोरीमुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. त्यानंतर कामकाजही तहकूब करण्यात आले. ज्या तरुणांनी लोकसभेत प्रवेश करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना खासदारांनी पकडून नंतर सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. ज्यावेळी लोकसभेत गोंधळ झाला होता, त्याचवेळी संसद भवनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्या प्रकरणातील एक तरुण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामधील असून आता त्याच चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
‘या’ खासदारांच्या नावावर मिळाले पास
या घडलेल्या प्रकारामुळे लोकसभेच्या सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचा प्रकार जगासमोर आला आहे. त्या दोघांनी प्रवेश कोणाच्या नावावर केला असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याबद्दलही स्पष्टीकरण देण्यात आले. म्हैसूर येथील खासदार प्रताप सिंह यांच्यामार्फेत त्यांना पास मिळाल्याचे प्राथमिक चौकशीत सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा >> …म्हणून संसद भवनसमोर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, नेमका काय घडला प्रकार?
‘घुसखोरी’चं लातूर कनेक्शन
तर लोकसभेबाहेर स्मोक कँडल घेऊन जाणाऱ्या अमोल धनराज शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो लातूर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर लोकसभेत घुसखोरी करणाऱ्याचे नाव सागर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नीलम सिंगच्याही घोषणा
यावेळी संसदेबाहेर सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी घोषणा देणारी महिला ही नीलम सिंग असल्याचे सांगण्यात आले आहे. ती हरियाणातील असल्याचे तपासात पोलिसांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणातील दुसरा तरुण आहे. त्या सागर नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून तो खासदार प्रताप सिंह यांच्याकडून त्याला पास मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
संसदेबाहेर स्मोक कँडल
संसदेबाहेर स्मोक कँडल फोडणाऱ्यांनी आधी फटाकेही फोडले होते. फटाके फोडत असतानाच त्यांनी भारतमाता की जय, हुकूमशाही चालणार नाही अशा प्रकारच्या घोषणाही दिल्या होत्या. हा सर्व धक्कादायक प्रकार ट्रान्सपोर्ट भवनबाहेर चालू होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुटातून स्प्रे काढला
देशाच्या लोकसभेवर 22 वर्षापूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या घटनेनंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लोसभेचं शून्य प्रहाराचे कामकाज सुरु असतानाच अचानक दोघा अज्ञात युवकांनी सभागृहात घुसखोरी करत गोंधळ माजवला. त्यातील एकाने बुटातून स्प्रे काढून त्याने सभागृहातच फवारला. तर त्याचवेळी संसदेसमोरही जोरदार गोंधळ झाल्याचा प्रकार पाहावयास मिळाला. संसदेसमोर पिवळ्या रंगाचा गॅस फोडल्याने संसद परिसर पिवळा दिसत होता.
तिघंही ताब्यात
लोकसभेत घुसणाऱ्याबरोबरच संसदेसमोर गोंधळ घालणाऱ्यांनाही पोलिसांना ताब्यात घेतले आहे. लोकसभेत गॅसचा फवारा मारल्याने त्याचाही त्रास खासदारांना झाला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT