महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून पुन्हा एकदा जाहीरपणे इशारा दिला. औरंगाबादेतील भाषणावरून राज यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ शकतो, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबादेतील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जातीपातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राज यांनी पवारांवर टीका करताना त्यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी असल्याची टीका केली. भाषणाच्या अखेरीस राज यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारला जाहीरपणे इशारा दिला.
राज ठाकरे यांनी काल मांडलेल्या भूमिकेवर खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. तोंड आम्हालाही आहे. राज ठाकरे यांच्या अविर्भावात बोलतील त्याच अंदाजात आम्हीही प्रत्युत्तर देऊ शकतो. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे.”
Raj Thackeray: ‘एकदा काय ते होऊन जाऊ द्या!’, अजान सुरु होताच राज ठाकरे भडकले!
“आम्ही राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. जेणेकरून बंधूभाव वाढेल. पण, राज ठाकरे यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं की, औरंगाबादेत चिथावणीखोर भाषण करायचं. त्यामुळेच राज ठाकरे वाढती महागाई, बेरोजगारी याबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. फक्त चिथावणीखोर भाषण केलं.”
“राज ठाकरेंनी ज्या धमकीच्या स्वरात माध्यमांसमोर सांगितलं की, एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. त्यांच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ सगळ्यांनाच माहितीये. आता हेच बघायचं आहे की, राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक आणि औरंगाबादचे पोलीस आयुक्त काय कारवाई करणार?,” असं जलील म्हणाले.
MNS: “तुमचं सगळ्या गावाशी जमतंय पण भावाशी जमत नाही”
“राज ठाकरेंनी औरंगाबादचीच सभेसाठी निवड का केली? आजकाल प्रत्येक पक्ष हाच विचार करतोय की राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी देशात जाळपोळ करावी लागेल. राज ठाकरेंचं वर्चस्व कमी होत आहे. सभेत लोक येतील आणि ऐकून जातील. पण आजची तरुण पिढी खूप हुशार आहे. त्यांना माहितीये की, नोकरी, उद्योग आणि कुटुंबाला कशा पद्धतीने चांगलं ठेवता येईल. इथे ७० वर्षांपासून सर्व जाती धर्माचे लोक शांततेनं राहत आहेत,” असं जलील यांनी सांगितलं.
राज ठाकरे भोंगे उतरवण्याबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत म्हणाले, “हे जर या पद्धतीने वागणार असतील. यांना जर सरळ सांगून समजत नसेल, तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ना, ती यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की, यांची एकदा थोबाडं बंद करा. माझी संपूर्ण देशवासियांना विनंती आहे की, बिल्कुल मागचा पुढचा विचार करु नका. हे भोंगे उतरलेच पाहिजे.”
दुपारपर्यंत झोपून रहायचं आणि म्हणायचं भोंग्याचा त्रास होतो- देसाईंचा राज ठाकरेंवर निशाणा
“सगळ्या धार्मिक स्थळांवरचे भोगे… उद्या मंदिरांवरचे असले तरीही उतरले गेले पाहिजे. पण यांचे उतरले गेल्यानंतर.. अभी नही तो कभी नही.. माझी हिंदू बांधवांना विनंती आहे की, जर हे ३ तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर हनुमान चालीस ऐकू आली पाहिजेच. पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ती घ्यावीच लागेल. हा विषय कायमचा निकाली लागेल ही अपेक्षा करतो,” असं ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT