तब्बल 13 महिलांवर बलात्कार करणारा वासनांध तुरुंगातून सुटला!

मुंबई तक

08 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

A lust-obsessed accused will be released from prison: मँचेस्टर: तब्बल 13 महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीची तुरुंगातून (prison) सुटका करण्यात आली आहे. अँड्र्यू बार्लो असे या वासनांध गुन्हेगाराचे (lust-obsessed accused) नाव आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला बार्लो हा 1988 साली पोलिसांच्या जाळ्यात अखेर सापडला होता. हे प्रकरण ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टरचे आहे. डिसेंबरमध्ये […]

Mumbaitak
follow google news

A lust-obsessed accused will be released from prison: मँचेस्टर: तब्बल 13 महिलांवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका व्यक्तीची तुरुंगातून (prison) सुटका करण्यात आली आहे. अँड्र्यू बार्लो असे या वासनांध गुन्हेगाराचे (lust-obsessed accused) नाव आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेला बार्लो हा 1988 साली पोलिसांच्या जाळ्यात अखेर सापडला होता. हे प्रकरण ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टरचे आहे. डिसेंबरमध्ये त्याच्या सुटकेची घोषणा करण्यात आली होती. त्याला उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनीही विरोध केला होता. 66 वर्षीय बार्लोने एकूण 13 महिलांवर बलात्कार केला होता. तसेच त्याच्याविरोधात इतरही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. (lustful accused who raped as many as 13 women was released from prison)

हे वाचलं का?

अँड्र्यू बार्लोला 13 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने तब्बल 34 वर्षे तुरुंगात काढली आहेत. आता त्याला तुरुंगातून एका वसतिगृहात नेण्यात आले आहे. पूर्वी तो अँड्र्यू लाँगमायर या नावाने ओळखला जात असे. मग त्याने आपले नाव बदलून अँड्र्यू बार्लो ठेवले होते.

तुरुंगातून का करण्यात आली सुटका?

बार्लोने बराच काळ तुरुंगात घालवल्यामुळे आता त्याला सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याने 34 वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे, त्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका होईल, असे पॅरोल बोर्डाने सांगितले होते. मात्र तो पोलिसांच्या निरीक्षणाखाली असेल. तसेच तो ग्रेटर मँचेस्टरला (Greater Manchester) जाऊ शकत नाही. त्याला ठरवून दिलेल्या ठिकाणीच तो राहू शकतो. तसेच त्याने काही नवे संबंध प्रस्थापित केले तर त्याबाबत त्याला माहिती देणं बंधनकारक असणार आहे. तसेच, त्याला नियमितपणे ड्रग टेस्ट देखील पास करावी लागेल. याशिवाय त्याच्यावर जीपीएसद्वारे देखील नजर ठेवण्यात येणार आहे.

पुण्यात 21 वर्षीय महिलेवर एकाच दिवशी दोनदा बलात्कार; आरोपी अटकेत

पीडित महिलांच्या काळजाचा ठोका चुकला

वासनांध आरोपी बार्लो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका पीडितेने याबाबत बोलताना सांगितले की, ‘मला भीती वाटते की तो पुन्हा आपले नाव बदलेल. मला हे देखील माहिती आहे की, त्याच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अनेक महिल्या या भीतीपोटी पुढे न आलेल्या नाहीत. त्याने 34 वर्षे तुरुंगात काढली, पण तो अजूनही तसाच दुष्ट माणूस आहे. मला वाटते की तो अजूनही धोकादायक आहे.

मैत्रिणीला घरी बोलावलं, शीतपेयातून बियर पाजत केला बलात्कार; आरोपी अटकेत

अर्थात, तो 66 वर्षांचा आहे, परंतु आता तो 34 वर्षांच्या तुरुंगवास भोगल्याचा ठपका माथ्यावर घेऊन फिरणार आहे. बार्लोला 1988 मध्ये 11 महिलांच्या बलात्कारासाठी 11 जन्मठेपेची आणि इतर गुन्ह्यांसाठी अतिरिक्त 56 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पुढे त्याला आणखी काही प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. 2010 आणि पुन्हा 2017 मध्ये त्याला आणखी दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा 1981 आणि 1982 च्या गुन्ह्यांसाठी देण्यात आली होती. मात्र, आता 34 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करण्यात येत आहे.

ब्रिटनमधील न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याप्रकरणी बोलताना असं म्हटलं की, ‘आम्हाला माहित आहे की पीडितांसाठी हा कठीण काळ असेल, परंतु अँड्र्यू बार्लो आयुष्यभर देखरेखीखाली असेल आणि जर त्याने त्याच्या सुटकेच्या कठोर अटींचे उल्लंघन केले तर त्याला पुन्हा तुरुंगात टाकले जाऊ शकते.’

पालघरमध्ये खळबळ! 16 वर्षाच्या मुलीवर 8 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

    follow whatsapp