–इम्तियाज मुजावर
ADVERTISEMENT
स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर पहिलं नाव घेतलं जात महाबळेशअवरचं… पण, याच महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना तुम्हाला स्ट्रॉबेरीचा खच पडलेला दिसेल. राज्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाने आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे.
अवकाळी पाऊस पडून चार ते पाच दिवस झाले असून, वातावरण पूर्णतः बदलून गेलं आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जावळी तालुक्यातील भुतेकर परिसरातील पन्नास ते साठ हेक्टरवरील स्ट्रॉबेरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
पावसानंतर शेतातच स्ट्रॉबेरी सडली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉबेरी नसली अशा किमान 50 एकरहून अधिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी ही बांधावर टाकून दिली आहे. करोडो रुपयांचे नुकसान भुतेकर मुरा या विभागातील शेतकऱ्यांचे झाले आहे. यातच विशाल किसन मानकुमरे यांची स्ट्रॉबेरी बांधावर टाकून दिली असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.
महाबळेश्वर तालुका हा स्ट्रॉबेरीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र जावळी तालुक्यात अद्यापही स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत, अशी माहिती शेतकरी विशाल मानकुमरे यांनी सांगितलं. महाबळेश्वर तालुक्यात कोणतेही स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले तरी तात्काळ त्याची नुकसान भरपाई व त्याचे पंचनामे केले जातात. मात्र जावळी तालुक्यात अजूनही स्ट्रॉबेरी मूळ पीक नसल्याने येथील कोणत्याही स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे झाले नाहीत, असं विशाल मानकर यांनी म्हटलं आहे.
अवकाळी पावसाने जावळी तालुक्यातील भुतेकर मुरा येथील स्ट्रॉबेरीचे आतोनात नुकसान झाले असून, अवकाळी पावसानंतर चार ते पाच दिवसा हा कालावधी समाप्त झाल्यानंतर आज अक्षरशः शेतकऱ्यांनी फळे तोडून उकिरड्यावर टाकली. सध्या असलेलं ढगाळ वातावरण, दाट धुके आणि मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, स्ट्रॉबेरी नासल्याने ती आम्ही शेवटी टाकून दिली, असं भुतेघर येथील शेतकऱ्यांनी सांगितलं. तर मानकुमरे म्हणाले, ‘ऐन हंगामात आम्हाला मोठा फटका बसला असून, शासनाने याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.’
ADVERTISEMENT