महाराष्ट्रात 34 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 93 टक्के

मुंबई तक

• 03:57 PM • 27 May 2021

महाराष्ट्रात 34 हजार 370 Corona रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 52 लाख 76 हजार 203 कोरोना रूग्णांना मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 21 हजार 273 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 425 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 1.63 टक्के झाला आहे. आजपर्यंत […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात 34 हजार 370 Corona रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 52 लाख 76 हजार 203 कोरोना रूग्णांना मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 93.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 21 हजार 273 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 425 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा 1.63 टक्के झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 40 लाख 86 हजार 110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 72 हजार 180 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला 22 लाख 18 हजार 278 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 19 हजार 996 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला 3 लाख 1 हजार 41 सक्रिय रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यात आज घडीला 3 लाख 1 हजार 41 Active रूग्ण आहेत. आज राज्यात 21 हजार 273 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 56 लाख 72 हजार 180 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 425 मृत्यूंपैकी 267 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 158 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 459 ने वाढली आहे. हे 459 मृत्यू, पुणे- 103, वर्धा- 56, ठाणे- 55, रत्नागिरी- 39, नागपूर- 35, भंडारा- 28, अहमदनगर- 27, सातारा- 22, सांगली- 21, सोलापूर- 18, नाशिक- 12, वाशिम- 8, बीड- 7, कोल्हापूर- 5, बुलढाणा- 4, नांदेड- 4, रायगड- 4, नंदूरबार- 3, चंद्रपूर- 2, लातूर- 2, यवतमाळ- 2, पालघर- 1 आणि परभणी-1 असे आहेत.

    follow whatsapp