Vaccination in State : राज्य सरकार खासगी हॉस्पिटलकडून कर्जतत्वावर लसी घेणार

मुंबई तक

• 12:53 PM • 12 Aug 2021

कोरोनाविरुद्ध लढाईत लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधला तणाव अजुनही सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकारमधला महत्वाचा घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावर उपाय म्हणून राज्य सरकार खासगी हॉस्पिटल्सकडून कर्जतत्वावर लसी घेणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. “काही दिवसांपूर्वीच आम्ही एक नवीन […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कोरोनाविरुद्ध लढाईत लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधला तणाव अजुनही सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकारमधला महत्वाचा घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तसेच लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावर उपाय म्हणून राज्य सरकार खासगी हॉस्पिटल्सकडून कर्जतत्वावर लसी घेणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

“काही दिवसांपूर्वीच आम्ही एक नवीन निर्णय घेतला आहे. ज्या खासगी हॉस्पिटल्सनी लस खरेदी केली आहे, त्यांच्याकडे लसीचा साठा करण्याची सोय नाहीये. अनेक हॉस्पिटल्सना आपल्या लसीचा साठा खराब होईल अशी भीती आहे. त्यामुळे सरकार खासगी हॉस्पिटल्सकडचा हा लसींचा साठा वापरणार असून ज्यावेळी राज्य सरकारला केंद्राकडून लस मिळेल त्यावेळी आम्ही खासगी हॉस्पिटल्सना लस परत देऊ. यामुळे सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.” नवाब मलिकांनी माहिती दिली.

केंद्राने राज्याला होणारा लसींचा पुरवठा पूर्ववत करावा अशीही आम्ही मागणी केल्याचं नवाब मलिक म्हणाले. ११ ऑगस्टला BMC ने लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे १२ आणि १३ ऑगस्टला महापालिकेची लसीकरण केंद्र बंद राहतील असं जाहीर केलं आहे. १४ जुलैपासून शहरात पुन्हा एकदा नव्याने लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याआधीही मुंबईत लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण बंद करायची वेळ आलेली आहे.

लसीच्या पुरवठ्यावरुन बोलत असताना नवाब मलिकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं. “लस नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. आम्हाला जेवढ्या लसींची गरज आहे तेवढ्या लसी मिळत नाहीयेत. सध्याच्या घडीला २० लाख लोकांना दुसऱ्या डोसची गरज आहे. ज्यावेळी लसींचा नवीन साठा येईल त्यावेळी या नागरिकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. ज्यामुळे इतर नागरिकांनाही लसीसाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. याच कारणामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत.”

Door to Door Vaccination : योग्य दिशेने जात आहात ! हायकोर्टाने केलं BMC चं कौतुक

    follow whatsapp