महाराष्ट्रात दारूच्या किंमतीत मोठी घट, एक्साईज ड्युटीबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई तक

• 12:53 PM • 20 Nov 2021

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या परदेशी मद्यावर विशेषत: स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात थेट 50 टक्के कपात करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील परदेशी मद्याची किंमत ही इतर राज्यांच्या बरोबरीने होईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ‘स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.’ अशी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या परदेशी मद्यावर विशेषत: स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात थेट 50 टक्के कपात करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील परदेशी मद्याची किंमत ही इतर राज्यांच्या बरोबरीने होईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. ‘स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क हे 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.’ अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे परदेशी मद्याची किंमत ही कमी होणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत भर होईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.

या संदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आयात केलेल्या परदेशी मद्य विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळतो. पण आता जो उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्य सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कारण उत्पादन शुल्क कमी झाल्याने मद्य विक्री वाढण्याची शक्यता अधिक आहे. सध्या परदेशी मद्य विक्री ही दिवसाला सरासरी एक लाख बाटल्यांपर्यंत होते. पण आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे दिवसाला 2.5 लाख बाटल्यांची विक्री होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्यामुळे पर्यायाने सरकारला देखील अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.

बनावट दारूच्या विक्रीला बसणार आळा

शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी परदेशी मद्याची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही देखील आळा बसेल असं म्हटलं जात आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्यांची विक्री होते. तर शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.

Online मद्य मागवणं अभिनेत्री शबाना आझमींना पडलं महागात, फसवणूक झाल्याचं उघड

मद्य विक्रीतून राज्याला सर्वाधिक महसूल

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात आयात केलेल्या मद्याच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील कमी किमतीत परदेशी मद्य खरेदी करता येणार आहे.

    follow whatsapp