काँग्रेसमुळेच आहे महाराष्ट्र सरकार! अशोक चव्हाणांपाठोपाठ बाळासाहेब थोरात यांचंही मोठं वक्तव्य

मुंबई तक

• 09:44 AM • 17 Dec 2021

महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे म्हणणाऱ्या भाजपलाही काही बोलण्यासाठी उरलं नाही. कारण या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही हे वक्तव्य केलं की आता हे सरकार पडेल असं वाटत नाही. अशात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी केलेली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल हे म्हणणाऱ्या भाजपलाही काही बोलण्यासाठी उरलं नाही. कारण या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनीही हे वक्तव्य केलं की आता हे सरकार पडेल असं वाटत नाही. अशात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी केलेली वक्तव्य ही चर्चेचा विषय ठरत आहेत, सगळ्यांच्या भुवया उंचावणारी ठरत आहेत.

हे वाचलं का?

‘महाविकास आघाडी’ स्थापनेचा निर्णय कधी अन् कसा झाला?; शरद पवारांनी उलगडलं गुपित

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे सरकारला म्हणजेच शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थेट इशाराच देऊन टाकला आहे. अशोक चव्हाण यांनी मंठा या ठिकाणी असलेल्या सभेत बोलताना असं म्हटलं आहे की काँग्रेसमुळेच सरकार आहे.

नितीन गडकरी चुकीच्या पक्षातला चांगला माणूस – अशोक चव्हाण

काय म्हणाले आहेत अशोक चव्हाण?

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा वाटा आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही (काँग्रेस) आहोत म्हणून सत्ता आहे. राज्यात विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करतं आहे. स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेतले तरी हरकत नाही. राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाने आमची निराशा झाली. भाजपला राज्यातील आणि देशातील आरक्षण संपवायचं आहे.’

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

‘महाविकास आघाडीबाबत आणि काँग्रेसबाबत जे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात चुकीचं काहीच नाही. काँग्रेस हा सरकारमधील घटक पक्ष आहे. प्रत्येक घटक पक्षाचं सरकारमध्ये सारखंच स्थान आहे. जे इतर इतर दोन पक्षांचं महत्त्व आहे तेच काँग्रेसचं महत्त्व सरकारमध्ये आहे.’ असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सूचक इशारा दिला आहे.

सुप्रिया सुळे, आव्हाड म्हणतात; 25 वर्ष ठाकरे सरकार चालेल.. पण याच प्रश्नावर अजित पवार का संतापले?

महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा महाराष्ट्रातला एक अभूतपूर्व प्रयोग आहे. काँग्रेस आणि शिवसेना कधी एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र हा एक प्रयोग महाराष्ट्रात घडला. 105 आमदार जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यश मिळवलं. आता दोन वर्षांनी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी जवळपास सरकारला इशाराच दिला आहे. याबाबत आता इतर दोन पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp