गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या नावे स्मारक उभारण्याची मागणी होत असतानाच राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लता मंगेशकर यांच्या नावे जागतिक दर्जाचं संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १२०० कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात हे संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.
कलिना परिसरातील २.५ एकर जागेवर १२०० कोटी रुपये खर्च करून हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
‘संगीत महाविद्यालय उभारण्याचं होतं स्वप्न’
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही या निर्णयाबद्दल माहिती दिली. ‘भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे. लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य संग्रहालय उभारणार. कलिना कॅम्पस समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जागेवर हे महाविद्यालय उभारणारलं जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.’
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?
‘आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते, परंतु वेळेत जागा उपलब्ध न झाल्याने ते पूर्ण होऊ शकलं नाही. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच समितीने आता या महाविद्यालयाला लता दीनानाथ मंगेशकर नाव देण्याचा प्रस्ताव दिला होता,’ असंही उदय सामंत यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT