विधान परिषद निवडणूक : नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे मारणार बाजी?, अकोल्याकडेही लक्ष

मुंबई तक

• 03:14 AM • 14 Dec 2021

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान झालं असून, आज दोन्ही जागांवरील निकाल घोषित होणार आहेत. दोन्ही ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली असून, मतदारांची संख्या मर्यादित असल्यानं लवकरच कोण बाजी मारणाह हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान झालं असून, आज दोन्ही जागांवरील निकाल घोषित होणार आहेत. दोन्ही ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली असून, मतदारांची संख्या मर्यादित असल्यानं लवकरच कोण बाजी मारणाह हे स्पष्ट होणार आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात आज मतमोजणी होत आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागावरील निवडणूक बिनविरोध झाली. दुसरीकडे राजकीय समेट न घडल्यानं नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली.

अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. दुसरीकडे तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस भाजपला मात देण्यासाठी छोटू भोयर यांना दिली. मात्र, काँग्रेसवर ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे. या दोन्ही जागांवर आज मतमोजणी होत असून, कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचं लक्ष लागलं आहे.

नागपूर निवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहे. नागपूरमध्ये 98.93 टक्के मतदान झाल असून, एकूण 560 पैकी 554 मतदारांनी मताधिकार बजावलेला आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत असणार आहे. तर काँग्रेसचे जुने उमेदवार हे मतदानात अधिकृत उमेदवार म्हणून बलेट पेपरवर कायम होते. त्यामुळे या निकालाची प्रतीक्षा आणि भोयर यांना मिळणाऱ्या मतांवर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करुन अवैध मते बाजूला करण्यात येणार आहे. 4 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरु झाली आहे.

    follow whatsapp