Navneet Rana : ‘बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला काहीही धोका नाही’

मुंबई तक

• 09:09 AM • 20 Jul 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी १२ खासदारही गेले आहेत. तसंच त्याआधी झालेलं राजकीय नाट्य सर्वांना ठाऊक आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आहेत. तसंच […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंगळवारी १२ खासदारही गेले आहेत. तसंच त्याआधी झालेलं राजकीय नाट्य सर्वांना ठाऊक आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. अशात अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आहेत. तसंच १२ खासदारही गेले आहेत. अशात आता पक्ष ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली आहे. Navneet Rana यांनी नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊ.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे नवनीत राणा यांनी शिवसेनेबाबत?

“बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या कोंडाळ्याला नक्कीच धोका आहे. येत्या काळात अनेक गोष्टी बदलणार आहेत. १२ खासदारही आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. येत्या काळात अनेक गोष्टी बदलतील. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत जे प्रकरण कोर्टात आहे त्यामध्येही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने न्याय मिळेल” असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde : “नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला, आता खरंच ‘ओके’ वाटतंय”

शिवसेनेची मूळ विचारधारा सोडली त्यांना धोका आहे असंही नवनीत राणांनी म्हटलंय

”ज्यांनी शिवसेनेची मूळ विचारधारा सोडली त्यांना धोका आहे. शिवसेनेला ५६ वर्षे झाली आहेत. एवढा जुना पक्ष असूनही आत्ता जे काही घडलं आहे ते शिवसेनेची मूळ हिंदुत्वाची विचारधारा सोडल्यानेच झालं आहे. ज्यांनी सतरंज्या उचलल्या, ज्यांनी खुर्च्या उचलल्या ज्यांनी रक्त आटवलं अशा शिवसैनिकांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही. न्यायालयाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागेल याचा मला विश्वास वाटतो.” असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. आज तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत नवनीत राणा यांनी हे भाष्य केलं आहे.

Eknath Shinde : “अन्यायाविरोधात पेटून उठा या बाळासाहेबांच्या विचारांवर आमची वाटचाल”

शिवसेनेतील बंडानंतर कायद्याचा पेच निर्माण झालाय. शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना नोटीस बजावली होती. त्याला शिंदे गटाने आव्हान दिलं. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश. शिवसेनेच्या आमदारांना व्हीप कुणाचा लागणार? अशा सर्वच मुद्द्यांवरून गोंधळ निर्माण झाला आहे.

सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय घटनापीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलेलं आहे. मात्र, आज झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी दोन्ही पक्षांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. त्याचबरोबर या प्रकरणावर पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

    follow whatsapp