मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाची (Corona Paitents) हलकीशी रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 15,229 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. याशिवाय आणखी चिंताजनक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Deaths) देखील वाढला आहे. कारण आज (3 जून) राज्यात तब्बल 307 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 04 हजार 974 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, काल (2 जून) राज्यात एकूण 15 हजार 169 नवे रुग्ण आढळून आले होते. तर आज 15 हजार 229 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसंच काल एका दिवसात 285 कोरोना पॉझिटिव्ह मृतांची नोंद झाली होती. तर आज हा आकडा वाढला असून मृतांची संख्या ही 307 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
राज्यात आज 25,617 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 54,86,206 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.73 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 307 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.68 टक्के एवढा आहे.
Exclusive: ‘महाराष्ट्र अनलॉक होण्याचा प्रश्नच नाही’, पाहा ‘त्या’ घोषणेबाबत विजय वडेट्टीवारांनी काय दिलं स्पष्टीकरण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,57,74,626 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,91,413 (16.19 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 15,66,490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 2,04,974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई (Mumbai) – 18 हजार 245
-
ठाणे (Thane) – 16 हजार 740
-
पुणे (Pune) – 26 हजार 443
-
नागपूर (Nagpur) – 9 हजार 719
-
नाशिक (Nashik)- 6 हजार 194
-
अहमदनगर (Ahmednagar) – 9 हजार 048
-
सातारा (Satara) – 16 हजार 192
-
औरंगाबाद (Aurnagabad)- 3 हजार 585
-
लातूर (Latur) – 3 हजार 281
-
नांदेड (Nanded)- 1 हजार 753
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 26 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय नागपुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या 73 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
Mumbai Mayor किशोरी पेडणेकरांचं आक्षेपार्ह ट्विट प्रकरण नेमकं काय आहे? काय दिलं स्पष्टीकरण?
मुंबईत दिवसभरात सापडले 961 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 961 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 897 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 75 हजार 193 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. डबलिंग रेट 500 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT