राज्यात दिवसभरात तब्बल 960 कोरोना रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

• 04:23 PM • 15 May 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचा (Corona Paitents) 34,848 रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या ही हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. आज दिवसभरात राज्यात 59,073 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचा (Corona Paitents) 34,848 रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या ही हळूहळू कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून तो 1 जूनपर्यंत कायम असणार आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. आज दिवसभरात राज्यात 59,073 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र असं असलं तरी राज्यातील कोरोनाच रुग्णांचा मृतांचा आकडा (Deaths) हा चिंता वाढवणारा आहे. कारण आज राज्यात तब्बल 960 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्यात सध्या 4 लाख 94 हजार 032 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

यावेळी राज्यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. इतर आस्थापने देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील रुग्णांचा आकडा हा अजून म्हणावा तसा नियंत्रणात आलेला नाही. रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पण दुसरीकडे मृतांचा आकडा सातत्याने वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनाशी लढा : मुंबईच्या रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

राज्यात आज 59,073 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 47,67,053 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.02 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 960 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.51 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,08,39,404 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53,44,063 (17.33 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,47,653 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,727 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,94,032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

म्युकोरमायकोसिस: ‘साहेब अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ हे इंजेक्शनचा तुटवडा होऊ देऊ नका, नाहीतर…’

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 34 हजार 083

  • ठाणे (Thane) – 29 हजार 654

  • पुणे (Pune) – 93 हजार 245

  • नागपूर (Nagpur) – 36 हजार 560

  • नाशिक (Nashik)- 20 हजार 218

  • अहमदनगर (Ahmednagar) – 30 हजार 221

  • जळगाव (Jalgaon) – 11 हजार 016

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 8 हजार 403

  • लातूर (Latur) – 8 हजार 799

  • नांदेड (Nanded)- 4 हजार 307

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 93 हजाराहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय नागपुरात देखील रुग्णांचा आकडा बराच जास्त आहे. नागपूरमध्ये सध्या 36 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

कोरोनामुळे बाललैंगिक अत्याचार आणि विधवांचं प्रमाण वाढत आहे

मुंबईत दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 1 हजार 447 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2 हजार 333 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 34 हजार 315 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92 टक्के आहे. डबलिंग रेट 213 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp