मुंबई: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. कारण मागील 24 तासातील राज्यात तब्बल 57 हजार 074 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 222 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची चिंता अधिकच वाढली आहे. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आता राज्यात सध्या 4 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आज राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कठोर निर्णय उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून लागू होणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी जवळपास बंद राहणार आहेत.
कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे
दरम्यान, राज्यात आज 27,508 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 25,22,823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.08 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 222 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,05,40,111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30,10,579 (14.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,05,899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,711 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,30,503 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा, तर उद्यापासून कठोर निर्बंध होणार लागू
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई – 66 हजार 803
-
ठाणे- 53 हजार 230
-
पुणे- 81 हजार 317
-
नागपूर- 53 हजार 638
-
नाशिक- 31 हजार 737
-
अहमदनगर- 14 हजार 293
-
जळगाव- 8 हजार 421
-
औरंगाबाद- 16 हजार 054
-
लातूर – 7 हजार 401
-
नांदेड- 11 हजार 079
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 81 हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात 53 हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.
मुंबईत दिवसभरात 11 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 11 हजार 779 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 5 हजार 263 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 71 हजार 628 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 82 टक्के आहे. डबलिंग रेट 42 दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT