मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (15 जून) दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 388 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,14,154 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचं दिसून आढळून आलं आहे. पण मृतांचा आकडा मात्र काही कमी होताना दिसत नाही. . हीच गोष्ट महाराष्ट्र सरकारसाठी सर्वात चिंतेची बाब आह
ADVERTISEMENT
गेल्या 24 तासात राज्यात 9,350 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर आता पु्न्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र दिसत आहेत. राज्यात सध्या 1 लाख 38 हजार 361 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात आज 15,176 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 56,69,179 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.69 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 388 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.93 टक्के एवढा आहे.
Covid vaccine death: एका 68 वर्षीय व्यक्तीचा लस घेतल्यानंतर मृत्यू, सरकारने केलं मान्य
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,84,18,130 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,24,773 (15.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,04,462 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,621 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,38,361 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई (Mumbai) – 17 हजार 519
-
ठाणे (Thane) – 14 हजार 032
-
पुणे (Pune) – 17 हजार 623
-
नागपूर (Nagpur) – 4 हजार 735
-
नाशिक (Nashik)- 4 हजार 640
-
कोल्हापूर (Kolhapur) – 12 हजार 949
-
अहमदनगर (Ahmednagar) – 4 हजार 705
-
सातारा (Satara) – 7 हजार 713
-
औरंगाबाद (Aurnagabad)- 1 हजार 637
-
लातूर (Latur) – 1 हजार 304
केंद्र सरकारला Covaxin लसीचा पुरवठा 150 रूपये प्रति डोस किंमतीने पुरवठा दीर्घकाळ शक्य नाही-भारत बायोटेक
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय कोल्हापुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 12 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
मुंबईत दिवसभरात सापडले 575 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 575 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 718 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 84 हजार 825 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. डबलिंग रेट 702 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT