Maharashtra Corona Cases: कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली, महाराष्ट्राची चिंता वाढली

मुंबई तक

• 06:27 PM • 27 Jun 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)9974 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात 143 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,21,286 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 9,974 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents)9974 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत 10 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिवसभरात 143 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,21,286 जणांचे कोरोनाने प्राण घेतले आहेत.

हे वाचलं का?

गेल्या 24 तासात राज्यात 9,974 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात रुग्णांच्या आकड्यात घट होत होती. मात्र राज्यातील नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात सध्या 1 लाख 22 हजार 252 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज (27 जून) 8,562 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 57,90,113 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.91 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 143 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.0 टक्के एवढा आहे.

Maharashtra Lockdown: महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; पाहा कुठे काय सुरु, काय बंद

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,10,42,198 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,36,821 (14.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,19,168 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,240 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,22,252 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 12 हजार 646

  • ठाणे (Thane) – 16 हजार 571

  • पुणे (Pune) – 17 हजार 364

  • नागपूर (Nagpur) – 3 हजार 945

  • नाशिक (Nashik)- 3 हजार 643

  • कोल्हापूर (Kolhapur) – 11 हजार 095

  • अहमदनगर (Ahmednagar) – 3 हजार 845

  • सातारा (Satara) – 8 हजार 351

  • सांगली (Sangli)- 9 हजार 843

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 1 हजार 270

Zydus Cadila vaccine: मोठी बातमी… ‘या’ महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस!

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील सध्या 11 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात सापडले 746 रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 746 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1295 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 94 हजार 082 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96 टक्के आहे. डबलिंग रेट 728 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp