पुण्यातील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती. परंतू या भेटीदरम्यान राजकारण्यांच्या गाड्या athletes’ race track वर लावण्यात आल्यामुळे राज्यभरातील क्रीडा प्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी याप्रकरणात माफी मागितली आहे.
ADVERTISEMENT
“चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मी प्रसार माध्यमांचा आभारी आहे. पुण्यातल्या क्रीडा प्रेमींचाही मी आभारी आहे. पवार साहेबांच्या तब्येतीचा विचार करुन आम्ही तो निर्णय घेतला. सिंथेटीक ट्रॅकचं आयुष्य १० वर्ष असतं, ते बदलणं आता गरजेचं आहे. २०१९ मध्ये आम्ही यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव दिला होता. मी माफी मागून भाजपचं समाधान होत असेल तर मी भाजपची माफी मागतो.” सुनील केदार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. “शरद पवार साहेबांच्या पायाचा प्रॉब्लेम लक्षात घेता त्यांना चालताना त्रास होऊ नये यासाठी सिमेंट ट्रॅकवर गाड्या पार्क करण्याची परवानगी दिली होती. परंतू दुर्दैवाने या गाड्या athletes’ race track वर पार्क झाल्या. मी याबद्दल माफी मागतो आणि भविष्यात असा प्रसंग होणार नाही याची खात्री देतो असं स्पष्टीकरण बकोरिया यांनी ANI शी बोलताना दिलं.”
ADVERTISEMENT