Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात दिवसभरात आढळले फक्त 982 कोरोना रुग्ण

मुंबई तक

• 02:32 PM • 09 Nov 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Covid 19 Second wave) देशासह महाराष्ट्रातील (Maharashtra) परिस्थिती आता जवळपास पूर्वपदावर आली असून, दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारीही (9 November) हा रुग्ण घटीचा आलेख कायम असल्याचं दिसून आलं असून, दिवसभरात 982 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. (982 new corona cases recorded today in maharashtra) तिसऱ्या […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर (Covid 19 Second wave) देशासह महाराष्ट्रातील (Maharashtra) परिस्थिती आता जवळपास पूर्वपदावर आली असून, दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारीही (9 November) हा रुग्ण घटीचा आलेख कायम असल्याचं दिसून आलं असून, दिवसभरात 982 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. (982 new corona cases recorded today in maharashtra)

हे वाचलं का?

तिसऱ्या लाटेबद्दल विविध शक्यता व्यक्त केल्या जात असल्या, तरी विध्वंसक ठरलेल्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील जनजीवन स्थिरावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून, दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनातून बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्याच मोठी आहे.

मंगळवारी राज्यात 1293 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 64,61,956 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेटही 97.62 टक्क्यांवर गेला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात आज केवळ 982 कोरोनाबाधित आढळून आले आहे.

राज्यात मंगळवारी 27 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या 2.12 टक्के इतका असून, 1,33,262 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 867 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 13,311 रुग्ण उपचाराधीन आहेत.

पुण्यातील कोरोना स्थिती कशी?

राज्यात आढळून आलेल्या 982 रुग्णांपैकी 113 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. पुण्यात दिवसभरात 59 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून, पुण्याबाहेरील असलेल्या 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 114 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, सक्रिय रुग्णांची संख्या 701 इतकी आहे. पुण्यात आतापर्यंत 9077 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आजपर्यंत 49,5,141 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

मुंबईतील कोरोना आकडेवारी

मुंबईत आज दिवसभरात 279 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर बरे झालेल्या 313 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मुंबईचा रिकव्हरी रेट सध्या 97 टक्के असून, 2,780 रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत आज दिवसभरात केवळ एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

    follow whatsapp