महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात लसच नाही

मुंबई तक

• 11:09 AM • 08 Apr 2021

महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात यावा म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण राज्यात लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागतंय. गोंदिया, सातारा, सांगली, चंद्रपूर आणि पनवेलमध्ये लसीचा साठा पूर्णपणे संपल्याचं चित्र आहे. तर, यवतमाळ, कोल्हापूर, नवी मुंबईमध्ये आज पुरतीच लस उपलब्ध आहे. यवतमाळ – यवतमाळमध्ये आता पर्यंत 1 लाख 45 हजार लस […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोना आटोक्यात यावा म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण राज्यात लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागतंय. गोंदिया, सातारा, सांगली, चंद्रपूर आणि पनवेलमध्ये लसीचा साठा पूर्णपणे संपल्याचं चित्र आहे. तर, यवतमाळ, कोल्हापूर, नवी मुंबईमध्ये आज पुरतीच लस उपलब्ध आहे.

हे वाचलं का?

यवतमाळ – यवतमाळमध्ये आता पर्यंत 1 लाख 45 हजार लस साठा प्राप्त झाला होता. त्यापैकी 1 लाख 39 हजार लसींचा वापर करण्यात आला असून सध्या स्थितीत 4 हजार लसी शिल्लक आहेत. त्यामुळे हा साठा एक दिवसही पुरणार नाही.

कोल्हापूर – कोल्हापुरातही रोज 35 हजार लसींची गरज असते. मात्र, आता 19 हजार डोस उपलब्ध आहेत. ते ही आज दुपारपर्यंत संपू शकतात.

नवी मुंबई – 1 लाख 44 हजार लसींचे डोस उपलब्ध होते, आता त्यातील फक्त 3200 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे इथला साठा आजच्या दिवस पुरेल एवढाच आहे. उद्यापासून इथे लसीकरम बंद करावं लागेल.

मुंबई – मुंबईतल्या 120 लसीकरण केंद्रांपैकी 26 केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवू लागला असून इतर ठिकाणीही उद्यापर्यंत लसीचा साठा पूर्ण संपलेला असेल.

रायगड, वाशिम, सोलापूर, नागपूरमध्येही दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे.

रायगड – रायगड जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे 1 लाख 34 हजार 200 व कोव्हॅक्सिनचे 15, 820 डोस उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी कोविशिल्डचे 12600 डोस शिल्लक आहेत.

वाशिम – वाशिममध्येही सध्या कोवॅक्सिनचे 5, 360 डोस आणि कोविशिल्डचे 4, 840 डोस शिल्लक आहेत. आज पुण्यावरून 33, 600 डोस उपलब्ध झाले आले तर एक आठवडा पुरेल. नाहीतर 2 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे.

सोलापूर – सोलापुरात ग्रामीणमध्ये 20, 890 लसींचा साठा उपलब्ध आहे, तर शहरात 4, 700 लशींचा साठा आहे. पण 2 ते 3 दिवसांमध्ये हा साठा संपेल.

ठाणे, उस्मानाबाद, अमरावती, नाशिकमध्ये चार ते पाच दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. ही स्थिती तर फक्त लसींबाबतची आहे. पण अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिविर इन्जक्शन उपलब्ध नाहीत अशीही स्थिती निर्माण झालीय त्यामुळे महाराष्ट्रातली कोरोना स्थिती खरंच गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होतंय.

    follow whatsapp