Maharashtra Lockdown: महाराष्ट्राची वाटचाल संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने, अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध

मुंबई तक

• 02:49 AM • 19 Apr 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Corona Cases) हे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसात दररोज 60 हजाराहून अधिक नवे पॉझिटिव्ह रुग्ण (Positive Paitents) सापडत आहेत. अशावेळी आतात महाराष्ट्राची वाटचाल ही संपूर्ण लॉकडाऊनच्या (Strict Lockdown) दिशेने सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रात लॉकडाऊन करावा लागू शकतो असं वक्तव्य स्वत: मंत्री […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे रुग्ण (Corona Cases) हे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसात दररोज 60 हजाराहून अधिक नवे पॉझिटिव्ह रुग्ण (Positive Paitents) सापडत आहेत. अशावेळी आतात महाराष्ट्राची वाटचाल ही संपूर्ण लॉकडाऊनच्या (Strict Lockdown) दिशेने सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रात लॉकडाऊन करावा लागू शकतो असं वक्तव्य स्वत: मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. दरम्यान, काही जिल्ह्यात आता अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल आता संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने सुरु झाली आहे.

हे वाचलं का?

पुणे (Pune): राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही पुण्यात आहे. इथे लाखांच्यावर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे पुण्यात फक्त औषधांची दुकानं वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूर (Solapur): सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. यातून मेडिकल आणि दूध विक्री वगळण्यात आले आहे. मेडिकल हे दिवसभर सुरू राहील तर दूध विक्री सकाळी 7 ते 1 आणि संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान सुरू असणार आहे.

Mumbai Lockdown: मुंबईत कठोर लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद

अमरावती (Amravati): कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी 7 पासून दुपारी 3 पर्यंतच सुरू राहतील. हॉटेल, उपाहारगृहे, बार व खाद्यगृहांना सायंकाळी ६ पर्यंत घरपोच सेवा देता येईल. पूर्वीच्या आदेशातील इतर तरतुदी कायम आहेत. सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, उपचार केंद्रे, प्रयोगशाळा, पेट्रोलपंप, एटीएम केंद्रे, औषधी दुकाने, वैद्यकीय उपकरणे पुरविणारे उत्पादक, वितरक, वैद्यकीय विमा कार्यालये आदी सर्व सेवा त्यांच्या वेळेत सुरळीत सुरू राहतील.

अहमदनगर (Ahmednagar): जिल्ह्यात कोरोना रूग्णाची वाढत असल्याने संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याचा आदेश जारी केला आहे. नागरिकांना विनाकारण बाहेर फिरू नये तसेच मेडिकल दुकानाव्यतिरीक्त सर्व दुकान बंद ठेवण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशात हाॅस्पिटल मेडीकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असून किराणा दुकाने, भाजीपाला, फळाची दुकाने आणि कृषी संबंधित दुकाने तसेच पशुखाद्य दुकाने व पेट्रोल पंप हे सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार असून 11 नंतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. 13 एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. अहमदनगर वाढत असलेल्या रूग्णाच्या संख्या पाहता जिल्ह्यात अधिकचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Manmohan Singh यांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिल्या 5 सूचना

लातूर (Latur): लातूर जिल्ह्यात देखील लॉकडाऊन आता आणखी कडक करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही फक्त सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार आहे. त्यानंतंर फक्त मेडिकल दुकानं सुरु राहणार आहेत.

Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?

नांदेड (Nanded): नांदेडमध्ये देखील कठोर लॉकडाऊन नियम आता लागू करण्यात येणार आहे. कारण इथे सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरु राहणार आहे.

औरंगाबाद (Aurangabad): औरंगाबादमध्ये देखील आता सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरु राहणार आहे.

उस्मानाबाद- 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार;
अंतिम दर्शनासाठीची नातेवाईकांची धडपड

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. मात्र, तरीही दररोज रुग्णांचा आकडा काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच आता राज्यातील जिल्हा पातळीवर कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.

    follow whatsapp