देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राचे सुपुत्र सचिन काटे यांना वीरमरण आलं आहे. राजस्थान या ठिकाणी त्यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. सचिन काटे हे साताऱ्यातील माण तालुक्यातील संभूखेड गावाचे आहेत. देशसेवा बजावत असताना सचिन काटे यांचा मृत्यू झाला आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री त्यांना वीरमरण आलं आहे. सचिन काटे यांच्या मृत्यूची बातमी समजताच संभूखेड गावावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
सचिन काटे यांना वीरमरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली आहे. पाच वर्षांपूर्वी सचिन काटे सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचा लहान भाऊ रेवन विश्वनाथ काटे आसाम येथे देशसेवा बजावत आहे. आई वडील हे गावी शेती करतात. सचिन काटे यांना वीरमरण आल्याची माहिती मिळताच माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई वडील आणि लष्कर सेवेत असलेले भाऊ असा परिवार आहे. सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथे लष्कराचे जवान घेऊन येत असून उद्या शनिवारी 23 रोजी संभूखेड या जन्म गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सचिन काटे यांचे प्राथमिक शिक्षण हे संभूखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. दहावीपर्यंतचे शिक्षणही तिथेच झालं. 11 आणि 12 वी विज्ञान शाखेतून महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केलं. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दहीवडी कॉलेज येथे कला शाखेत प्रवेश घेऊन NCC जॉईन केलं. याच वर्षी 2016 मध्ये सचिन काटे हे लष्करात भरती झाले. शालेय जीवनात असताना त्याला कबड्डी हा खेळ आवडत असे.
सिकंदराबाद या ठिकाणी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सचिन काटे राजस्थानमध्ये कार्यरत होता. लहानपणापासून देशसेवेची ओढ असल्याने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 19 व्या आर्मीमध्ये भरती आहे लहान तो आर्मीमध्ये भरती झाला. त्यांचा लहान भाऊ रेवन हा देखील आर्मीत आहे.
ADVERTISEMENT