MVA announces direct support to Shubhangi Patil: मुंबई: नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीची (Nashik Graduate Legislative Council Election) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे (Congress) नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. त्यातही काँग्रेसने स्पष्टपणे म्हटलं होतं की, आम्ही याबाबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून निर्णय घेऊ. आता याचबाबत आज (19 जानेवारी) झालेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीने आता मोठा निर्णय जाहीर केला आहे. (mahavikas aghadis blow to satyajeet tambe direct announces direct support to independent candidate shubhangi patil)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी विधान परिषद निवडणुकीत कोणकोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे जाहीर केलं.
विधान परिषद: Nana Patole यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले सत्यजीत तांबेंना..
ज्यामध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसने अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सत्यजीत तांबेंना मोठा झटका दिला आहे.
पाच विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने कोणा-कोणाला जाहीर केला पाठिंबा?
-
नागपूर – सुधाकर अडबाले
-
अमरावती – धीरज लिंगाडे
-
औरंगाबाद – विक्रम काळे
-
नाशिक – शुभांगी पाटील
-
कोकण – बाळाराम पाटील
या उमेदवारांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेस सोडणार? सत्यजीत तांबेंनी दिले संकेत : Audio Clip Viral
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काय घडलं?
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘जगातील सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा गवगवा करणाऱ्या भाजपकडे नाशिक मतदारसंघात स्वत:चा उमेदवार मिळालेला नाही. सध्या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असं सगळीकडे वातावरण आहे.’
‘आजच सत्यजीत तांबे यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई केली जाईल. सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी कोणाचा पाठिंबा मागायचा कोणाचा नाही हे आता त्यांनी ठरवावं.’
‘नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. आतापर्यंत तीन टर्म हे सातत्याने सुधीर तांबे काँग्रेस विचारधारेने निवडून आलेले होते. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल.’
‘बाळासाहेब थोरात हे देखील शुभांगी पाटलांच्या प्रचाराला दिसतील. सध्या ते आजारी असून ते रुग्णालयात आहेत. मी आजही त्यांना सकाळी संपर्क केला. आमचा संपर्क त्यांच्यासोबत आहे. मविआच्या उमेदवाराच्या प्रचाराला त्यांनी सोबत राहावं अशी विनंती त्यांना करणार आहोत आणि ते सोबत राहतील.’
‘नाशिकमध्ये भाजपला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे आता नेमकी स्पष्टता येणार आहे. ही जी काही मागून वार करण्याची पद्धत भाजपने महाराष्ट्रात आणली आहे दुसऱ्यांची घरं फोडण्याचा प्लॅन भाजप करतं आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. आता तांबे कुटुंबीयांचं काय झालं ते आम्हाला माहित नाही. त्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं आहे.’ असं म्हणत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबेंबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT