Mahesh Gaikwad Case : फरार आरोपींना पकडा, 25 हजार बक्षीस मिळवा... महेश गायकवाड यांच्याकडून बक्षीस

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणात गणपत गायकवाड यांच्या मुलगा फरार आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

15 Jan 2025 (अपडेटेड: 15 Jan 2025, 04:16 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात केला होता गोळीबार

point

शिंदेंच्या नेत्याकडून फरार आरोपींवर बक्षीस जाहीर

point

अटक आरोपी गणपत गायकवाडबद्दलही खळबळजनक दावा

कल्याण: उल्हासनगरमधील हिललाइन पोलीस ठाण्यात तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माजी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेतील मुख्य आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. पण गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, कुणाल पाटील आणि नागेश बडेराव अजूनही फरार आहेत. त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. पण आता स्वत: महेश गायकवाड यांनीच एक घोषणा करत आरोपींवर इनाम जाहीर केलंय. आरोपी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, कुणाल पाटील आणि नागेश बडेराव यांना पकडणाऱ्या पोलिसांना 25000 रुपयांचे बक्षीस दिलं जाईल असं म्हटलंय. महेश गायकवाड यांनी असंही सांगितलं की, बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमा केली जाईल.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> No Parking No Car : पार्किंग नाही, तर कार मिळणार नाही... राज्य सरकार नवं धोरण आणण्याच्या तयारीत?

2 फेब्रुवारी 2024 च्या रात्री, जमिनीच्या वादातून माजी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या असल्या तरी त्यांचा जीव वाचला. तर आरोपी गणपत गायकवाड यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी इतर तीन आरोपींना फरार दाखवलं असून, त्यामध्ये पहिलं नाव गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचं आहे. तर वैभव गायकवाड हा देखील भाजपचा पदाधिकारी आहे.

हे ही वाचा >> Nylon Manja Deaths : मांजा गळ्यात अडकला, थेट श्वासनलिका कापली गेली; राज्यात तिघांचा मृत्यू, 2 गंभीर

महेश गायकवाड यांनी एक खुलासा केला आणि सांगितलं की, आरोपी गणपत गायकवाडला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. पण उपचाराच्या नावाखाली तो मुंबईच्या जेजे रुग्णालयात आहे. तो रुग्णालयात येतो, मुंबईत फिरतो, त्यानंतर तो पनवेलमधील एका आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो आणि नंतर तळोजा तुरुंगात जातो.

महेश गायकवाड यांनी पुढे आरोप केला की, कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी विशाल गवळीला पोलिस कोठडीत बिर्याणी खायला देण्यात आली कारण तो भाजपशी संबंधित होता. तसंच भारतीय जनता पक्षाने वैभवला पक्षपदावरून काढून टाकलेलं नाही हा उल्लेख सुद्धा त्यांनी केला. या प्रकरणात तीन आरोपींना जामीन मिळाला आहे. दुसरा आरोपी फरार आहे. त्यामुळे कल्याणमध्ये महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यातील लढाई काही संपत नाहीये.

    follow whatsapp