अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप करून मलायका आयसोलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा

मुंबई तक

• 11:36 AM • 12 Jan 2022

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कूपर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडच्या मोस्ट फेव्हरेट कपल्सपैकी एक म्हणून गणले जातात. या दोघांचं रिलेशनशिपबाबत लोकांना कळलं तेव्हा अनेकजण खूप खुश झाले आहेत. या दोघांना नेहमी स्पॉट केलं जायचं. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये हे लंच किंवा डिनरसाठी जात असतात. त्यावेळी या दोघांचा रोमॅटिंक अंदाज पाहण्यास मिळाला आहे. या दोघांनीही त्यांच्या वयाच्या अंतरावर […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कूपर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडच्या मोस्ट फेव्हरेट कपल्सपैकी एक म्हणून गणले जातात. या दोघांचं रिलेशनशिपबाबत लोकांना कळलं तेव्हा अनेकजण खूप खुश झाले आहेत. या दोघांना नेहमी स्पॉट केलं जायचं. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये हे लंच किंवा डिनरसाठी जात असतात. त्यावेळी या दोघांचा रोमॅटिंक अंदाज पाहण्यास मिळाला आहे. या दोघांनीही त्यांच्या वयाच्या अंतरावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सनाही जोरदार उत्तर दिलं. दोघांचं म्हणणं हे आहे की त्याने आम्हाला काही फरक पडत नाही.

हे वाचलं का?

आता बातमी ही समोर येते आहे जी ऐकून या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल आहे. एवढंच नाही तर ही बातमीही समोर येते आहे की अर्जुन कपूरसोबत तिचं ब्रेक अप झाल्यानंतर ती आयसोलेशनमध्ये गेली आहे असं कळतं आहे. बॉलिवूड लाइफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा सात दिवसांपासून मलायका घरातून बाहेर पडलेली नाही. ती आयोसेलेशनमध्ये आहे. मलायका खूप दुःखात आहे असंही सांगितलं जातं. काही काळ ती जगापासून दूर राहू इच्छिते असंही समजतं आहे.

मलायका अरोराचा मेटॅलिक ड्रेस खूपच चर्चेत!

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी गेला होता. तिथे डिनर होते मात्र मलायका तिथे गेली नव्हती. मलायका आणि रिया यांची घरं जवळजवळ आहेत. मात्र तरीही अर्जुन कपूर मलायकाच्या घरीही गेला नाही. बऱ्याचदा अर्जुन कपूर आणि मलायका फॅमिली डिनर्ससाठी सोबत जात असतात. यावेळी असं झालं नाही.

अर्जुन कपूर जेव्हा त्याच्या बहिणीच्या घरी जातो तेव्हा मलायकाच्या घरी जातो. मात्र अर्जुन यावेळी रियाच्या घरून परत आला. अर्जुन कपूर आणि मलायका कॉफीसाठी किंवा डेटवरही जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांना स्पॉटही करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अर्जुन आणि मलायका यांचं ब्रेक अप झाल्याची जोरदार चर्चा आहे.

वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर अर्जुन कपूरकडे काही प्रोजेक्ट आहे. मागच्या वर्षी आलेल्या भूत पोलीस या सिनेमात तो सैफसोबत झळकला होता. एक व्हिलन रिटर्न्स या सिनेमात आता तो दिसणार आहे. तर मलायका अरोरा इंडियाज बेस्ट डान्समध्ये जज म्हणून झळकली होती.

    follow whatsapp