ADVERTISEMENT
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच बोल्डनेस आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.
तिच्या लूकवरून कुणालाही तिच्या वयाचा अंदाज लावणं शक्य होणार नाही. हे फोटो बघून मलायका ४५ वर्षांची आहे, कुणालाही पटणार नाही.
मलायकाच्या स्टाईल स्टेटमेंटचीही चर्चा होत असते. मलायक नेहमीच वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
मलायकाने पुन्हा एकदा खास फोटोशूट केलं असून, तिच्या नव्या फोटोंची चर्चा सुरू झाली आहे.
मलायकाने मेटॅलिक गाऊन परिधान केलेला आहे. डीप नेलकाईन ड्रेसमध्ये मलायकाचं सौंदर्य खुलून आलं आहे.
निळा, पिवळा आणि गुलाबी रंगांचंं कॉम्बिनेशन जुळून आल्यानं मलायकाच्या सौंदर्यात आणखी भर पडल्याचं दिसत आहे.
मलायका सध्या ‘सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन-2’चं शुटिंग करत आहे.
हा टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो असून, या ‘शो’ एका एपिसोडमध्ये मलायकाने हा गाऊन परिधान केलेला आहे.
मलायकाच्या या गाऊनची किंमत १ लाख ७० हजार इतकी आहे.
मलायका अरोराने मेटॅलिक गाऊनवरील नजर खिळवून ठेवणारे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT