मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. ७ हजार ८९७ मतं मिळवत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले शशि थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. अशात आता त्यांचा विजय झाला आहे. त्यांचा विजय झाल्यानंतर शशी थरूर यांनीही त्यांचं अभिनंदन केलं.
ADVERTISEMENT
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत एकूण ९ हजार ३८५ जणांनी मतदान केलं होतं. त्यातली ४१६ मतं बाद झाली. खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली तर थरूर यांना १०७२ मतं मिळाली आहेत.
तत्व आणि विचारधारेसाठी मी लहानपणापासूनच लढलो: खर्गे
‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार मी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचे खरगे यांनी सांगितलं. माझ्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला माहिती आहे. मी लहानपणापासून आजपर्यंत तत्वं आणि विचारधारेसाठी लढत आलो आहे. माझ्या आयुष्यात लहानपणापासून संघर्ष आहे. अनेक वर्ष मंत्री होतो आणि विरोधी पक्षनेताही. सदनात भाजप आणि संघाच्या विचारसरणीविरोधात लढत राहिलो. मला पुन्हा लढायचे आहे आणि लढून मी तत्त्वे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले होते.
कट्टर काँग्रेसी आहेत मल्लिकार्जुन खर्गे
पुढचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा असला पाहिजे? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला गेला होता तेव्हा ते म्हणाले होते की अध्यक्ष कुणीही झालं तरी हरकत नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे विचार, विश्वास, धोरण आणि भारताविषयीचा दृष्टीकोन या सगळ्याचं प्रतिनिधीत्व होतं. राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्या उत्तरात मल्लिकार्जुन खर्गे हे एकदम फिट बसतात.मल्लिकार्जुन खरगे हे कट्टर काँग्रेसी आहेत. त्यांनी अगदी कार्यकर्ता पदापासून काँग्रेसमधली कारकीर्द सुरू केली आहे. १९६९ मध्ये ते गुलबर्गा सिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.
मल्लिकार्जुन खर्गे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध
मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध आहेत. आता तसंच त्यांचं नाव रेसमध्ये कुठंही नव्हतं. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मल्लिकार्जुन खर्गेंनी अर्ज भरला. त्याआधी त्यांची प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दिग्विजय सिंह यांनीही त्यांचा अर्ज मागे घेतला. शशि थरूर विरूद्ध मल्लिकार्जुन खर्गे अशी लढत झाली. त्यात मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे.
ADVERTISEMENT